परभणी (प्रतिनिधी,)प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी मराठी राजभाषा दिनानिमित्त अक्षर प्रतिष्ठा व गणेश वाचनालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकारती मध्ये चाळीस वर्षा पासुन आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणारे दयानंद माने(निवासी संपादक सकाळ) यांची प्रकट मुलाखत “संवाद अनुभवाचा” या कार्यक्रमात घेण्यात येणार आहे
येथी गणेश वाचनालय शनिवार बाजार येथे दि 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमास जेष्ठ विधिज्ञ अशोक सोनी यांची प्रमुख उपस्थिती आहे, ही मुलाखत साहित्यिक सौ अर्चना डावरे पत्रकार विजय कुलकर्णी घेणार आहेत.
तरी सर्व रसिक,वाचक यांना कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन गणेश वाचनालय चे ग्रंथपाल संदीप पेडगावकर यांनी केले आहे.


