सेलू 🙁 प्रतिनिधी) कथा ही सांगायची नसते. या हृदयातून ती त्या हृदयात पोहोचवायची असते. छोट्या पडद्यावर व प्रत्यक्ष कथा ऐकणे यात फरक आहे. संपूर्ण ऊर्जा मिळवायची असेल तर कथाही कथा मंडपात ऐकल्याशिवाय संपूर्ण ऊर्जा मिळू शकत नाही. कारण उत्तम कथेतून ऊर्जा प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले आहे. बुधवारी, २३ ऑक्टोबर रोजी महाआरती व महाप्रसादाने नऊ दिवसांच्या रामकथेची उत्साहात सांगता झाली. नूतन विद्यालयाच्या हनुमानगढ परिसरात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराजांच्या अमृतवाणीतून १५ ते २३ ऑक्टोबर दरम्यान कथेचे आयोजन करण्यात आले होते. नवव्या दिवशी व्यासपीठावर श्रीसालासरजी (भक्त हनुमान) प्रतिकृती उभारण्यात आली होता. स्वामीजी…
Author: Lok Sanchar
परभणी ( प्रतिनिधी) येथील अक्षदा मंगल कार्यालयात बुधवार, दि.२३ आॅक्टोबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता,पदाधिकारी संवाद मेळावा पार पडला. यावेळी खा.संजय जाधव आ.डॉ. पाटील, शिवसेना सह संपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना खा. संजय जाधव म्हणाले की, परभणी विधानसभा मतदारसंघात आम्ही मागील ३० वर्षांपासून हा शिवसेनेचा गड अभेद्य ठेवला आहे. यापुढे देखील तो अभेद्य राहणार यात शंका नाही. आ. डॉ.पाटील यांनी मागील १० वर्षांमध्ये परभणी मतदार संघात लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर प्रत्येक घरातील, कुटुंबातील सदस्य म्हणून काम करत आहेत. त्यामुळे जनतेच्या मनामनात…
परभणी ( प्रतिनिधी)प्रिय इंदिरा गांधी स्टेडियम येथील अतिथी हॉटेल येथे रुडीग्रस्त कलावंत संघर्ष समिती महाराष्ट्र या संघटनेचे जिल्हा कार्य करण्याची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष बायजाबाई घोडे यांची उपस्थिती होती तसेच बैठकीला मराठवाडा प्रदेश अध्यक्ष विलास रणखांबे, जिल्हाध्यक्ष सुनीता रणदिवे ,बहुसंख्येने सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संस्था अध्यक्ष मराठा प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्ष व सचिव यांची नियुक्ती या पदावर सर्व मोहिते निवड करण्यात आली आहे तसेच पत्र जिल्हाध्यक्ष सुनीता रणदिवे , मराठवाडा प्रदेश अध्यक्ष विलासरण खांबे तथा संस्थापक अध्यक्ष बायजाबाई घोडे यांच्या सहीने पत्र देऊन निवड करण्यात तसेच त्यांचे पुढील कार्यास गवळणबाई पंचांगे , सावित्रा बागल, नारायण जोरवर, राजेभाऊ…
परभणी (प्रतिनिधी) परभणी विधानसभा मतदार संघातून आ.डॉ.राहुल पाटील हॅट्रिक साधणार हे निश्चित आहे. त्यांचे मताधिक्य मागच्या वेळेस ८१ हजार होते यावेळेस ८१ हजाराहून १ लाखाच्या पुढे कसे जाईल यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन खा. संजय जाधव यांनी केले. येथील अक्षदा मंगल कार्यालयात बुधवार, दि.२३ आॅक्टोबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता,पदाधिकारी संवाद मेळावा पार पडला. यावेळी खा. जाधव बोलत होते. यावेळी आ.डॉ. पाटील, शिवसेना सह संपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना खा. जाधव म्हणाले की, परभणी विधानसभा मतदारसंघात आम्ही मागील ३० वर्षांपासून…
परभणी,( प्रतिनिधी) आज बुधवार, दि 23 ऑक्टोबर 2024 रोजी वितरण केलेले नामनिर्देशन पत्र व उमेदवारांनी दाखल केलेले नामनिर्देशन पत्राची माहिती मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे- 95- जिंतूर विधानसभा मतदारसंघ – 6 उमेदवारांनी 6 अर्ज घेतले. तर ज्ञानेश्वर देविदास राठोड (अपक्ष), ज्ञानेश्वर नुरा राठोड (अपक्ष), अच्युत लिंबाजी कदम (अपक्ष), विजय अण्णासाहेब ठोंबरे (अपक्ष), मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर (भारतीय जनता पार्टी), विनोद दत्तात्रय भवाळे (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. 96- परभणी विधानसभा मतदारसंघ – 25 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले. 97- गंगाखेड विधानसभा मतदारसंघ – 32 उमेदवारांनी 50 अर्ज घेतले. तर रत्नाकर माणिकराव गुट्टे (राष्ट्रीय समाज पक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. 98- पाथरी विधानसभा मतदारसंघ…
परभणी, (प्रतिनिधी) :- निवडणूक निरीक्षक (खर्च) राहूल मिश्रा यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणुकीशी संबंधित खर्च विषयक बाबींचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, जिल्हा कोषागार अधिकारी निळंकठ पाचंगे आदींसह निवडणूक खर्च संबंधी नियुक्त अधिकारी व सहायक अधिकारी, जीएसटीचे अधिकारी उपस्थित होते. मिश्रा यांनी सूचना करताना म्हणाले की, निवडणुकीच्या कालावधीत वाहनातून अवैधरित्या होणारी दारु, रोख रक्कम यांच्या वाहतुकीवर निगराणी पथकांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ कार्यवाई…
परभणी (प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 95- जिंतूर विधानसभा मतदारसंघ, 96- परभणी विधानसभा मतदारसंघ 97- गंगाखेड विधानसभा मतदारसंघ -98, पाथरी विधानसभा मतदारसंघांकरीता राहूल मिश्रा (आय.आर.एस.) यांची निवडणुक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती केली आहे. निवडणूक निरिक्षक (खर्च) राहूल मिश्रा यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल क्रमांक 8180071814 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. निवडणूक कालावधीत राहूल मिश्रा यांचा मुक्काम सावली, शासकीय विश्रामगृह, परभणी येथे असणार आहे. त्यांना भेटण्याची वेळ दुपारी 4.00 ते सांयकाळी 6.00 वा. अशी आहे. निवडणुक निरीक्षक (खर्च) यांचे संपर्क अधिकारी म्हणुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नियंत्रक पि.डी. निर्मळ, भ्रमणध्वनी क्रमांक 9423324809 यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हा…
परभणी(प्रतिनिधि) चार विधानसभा मतदार संघात निवडणूक संदर्भात स्वीप पथकाच्या वतीने युवक, महिला, वयोवृद्ध, नवमतदार, भावी मतदारांमध्ये ग्रामीण आणि शहरी भागात जावून मतदान जनजागृती करण्यात येणार आहे.त्या मतदान जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मंगळवार (दी.22) रोजी उद्घाटन करण्यात आले. यावेळी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे,तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे,विज्ञान सूचना व तंत्रज्ञान अधिकारी सुनील पोटेकर,जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा जेष्ठ अधिव्याख्याता गणेश शिंदे नायब तहसीलदार रेड्डी, दत्ता गिणगीने,आदिंची उपस्थिती होती.तसेच यावेळी स्वीप पथकाचे सदस्य प्रवीण वायकोस, अरविंद शहाणे, त्र्यंबक वडसकर, हनुमंत हंबीर, रामप्रसाद अवचार, प्रा.भगवान…
परभणी,(प्रतिनिधी) : येथील पतंजली योग समितीच्या वतीने 23 ते 29 आक्टोंबर या कालावधीत सकाळी ठीक 5.30 ते 7.30 या वेळामध्ये मोफत योग प्राणायम शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दत्तनगरातील चौंडेश्वरी मंदिराजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात आयोजित केलेल्या या शिबीराचे उद्घाटन योग शिक्षक सुभाष मेनकुदळे, श्री श्री रविशंकरजी महाराज, भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी धोंडीराम शेप, पतंजली युवा भारतचे प्रभारी प्रा. अनिल बडगुजर, बालाजी काळे आदींच्या उपस्थितीत होणार आहे. विशेष या शिबिरामध्ये फिजिओथेरपिस्ट डॉ. अनंत कर्हाळे यांचे स्ट्रेचिंगचे व्यायाम होणार आहेत. शिबीरार्थींनी मॅट किंवा सतरंजी, पाणी बॉटल, नॅपकिन सोबत घेऊन यावे, असे आवाहन पतंजली योग समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
परभणी (प्रतिनिधी):- आज मंगळवार, दि 22 ऑक्टोबर 2024 रोजी वितरण केलेले नामनिर्देशन पत्र व उमेदवारांनी दाखल केलेले नामनिर्देशन पत्राची माहिती मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे- 1) 95- जिंतूर विधानसभा मतदारसंघ – 18 उमेदवारांनी 35 अर्ज घेतले. तर दिनकर धारोजी गायकवाड यांनी बहुजन रिपब्लीकन सोशलीस्ट पार्टीच्यावतीने नामनिर्देशन पत्र दाखल केले. 2) 96- परभणी विधानसभा मतदारसंघ – 21 उमेदवारांनी 30 अर्ज घेतले. तर अ. पाशा अ. गफ्फार खुरेशी यांनी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीच्यावतीने नामनिर्देशन पत्र दाखल केले. 3) 97- गंगाखेड विधानसभा मतदारसंघ – 17 उमेदवारांनी 27 अर्ज घेतले. 4) 98- पाथरी विधानसभा मतदारसंघ – 18 उमेदवारांनी 52 अर्ज घेतले तर अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्रानी (अपक्ष)…

