पालम (प्रतिनिधी) मुस्लिम समाजाचे अत्यंत महत्वपूर्ण असलेला पवित्र रमज़ान महिनात सर्व वयोवृद्ध पासुन ते चिमुकले उपवास ठेवत असतात या महिन्यात उपवासा सह नमाज, जकात, (दानधर्म) पवित्र कुराणाचे पठण करून मुस्लिम बांधव अल्लाह (ईश्वर) कड़े आपली श्रद्धा प्रगट करत असतात या रमज़ानच्या महिनात मुस्लिम समाजात भक्तिमय वातावरण राहते यात मोठ्या पासुन ते लहान पर्यंत सर्व जण रोजे (उपवास) धरत असतात अशात पालम जिल्हा परभणी येथील रहीवाशी व पालम सिटीजन्स पेपरचे संपादक शेख गौसोद्दीन यांचा मुलगा शेख सऊद शेख गौसोद्दीन वय ७ वर्ष यांनी आपल्या आयुष्यातला पहिला रोजा ठेवत
अल्लाह (ईश्वर) प्रति आपली आस्था ठेवत सकाळी ५:२२ वाजता निहारी (सहेरी) करून दिवस भर अन्न व पाणी वीणा राहून पाच वेळ नमाज व पवित्र कुराणचे वाचन करून दिवस भर १३ तासावरचे कडक उन्हात उपवास ठेवत आपली श्रद्धा अल्लाह ईश्वर कड़े प्रगट केली यावेळी त्यांचे सर्वत कौतुक होत आहे. शेख सऊद यांनी आपल्या आयुष्यातला पहिला रोजा ठेवल्याबद्दल त्यांचे आजी-आजोबा, काका काकू, बुवा, आई-वडील, बहीन व नातेवाईकांनी शेख सऊद चे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.