भिक्खू संघाची धम्मदेशना ; व आंबेडकरी गायिका कडुबाई खरात यांच्या भीमगीत गायनाचा कार्यक्रम
परभणी (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय पंचशील धम्म ध्वजानिमित आज ८ जानेवारी २०२६ रोजी मांडाखळी – उमरी परिसरात नियोजित बुद्ध विहाराच्या जागेवर पहिल्या आंतरराष्ट्रीय बुद्धधम्म परिषद व बुद्धमूर्ती वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आश्रय सेवाभावी संस्था व डॉ गगन मलिकफाउंडेशनच्या वतीने या परिषदेचे आयोजन डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे (अध्यक्ष आश्रय सेवाभावी संस्था तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु. जाती विभाग ) यांनी केले आहे.या परिषदेचे उदघाटन भदंत थेपवज्जी सुंथरम वॉटफ्रा बुद्धविहार थायलंड, यांच्या हस्ते होणार आहे. तर परिषदेला प्रमुख मार्गदर्शन म्हणून भदंत डॉ. अग्रहेरा कश्यप थेरो, अध्यक्ष शाक्य फाउंडेशन श्रीलंका, परिषदेच्या अध्यक्षस्थानी भदंत क्वांग धम्मलोक त्रूकलाम बुद्ध विहार व्हिएतनाम यांची उपस्थिती राहणार आहे. बुद्धधम्म परिषदेला भदंत शरणानंद महाथेरो, भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो, कार्याध्यक्ष अ .भा.भि.संघ, भदंत डॉ. खेम्मोधम्मो महाथेरो मुळावा, भदंत डॉ.इंदवंश महाथेरो छ.संभाजी नगर, भदंत डॉ. धम्मदिप महाथेरो, महू मध्यप्रदेश, भदंत पय्यावंश , भदंत नागसेन बोधी,भदंत महावीर, भदंत पय्यानंद, भदंत मुद्दितानंद, भदंत धम्मशिल, भदंत धम्मबोधी भदंत, मोग्गलायन आदी भिक्खू संघ उपस्थित राहणार आहे. परिषदेला विशेष उपस्थिती म्हणून श्रीलंका येथील अभिनेत्री, कौशल्या विक्रमसिंह ,(कोलंबो) श्रीलंका, उपा.अभिनेत्री पाबीरीसी (थायलंड) , मि.आलिसा ऑस्ट्रेलिया, उमाफोन थायलंड, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वैभव कोलथरकर श्रीलंका, डॉ. नटकिट थायलंड, प्रसिद्ध सिने अभिनेता डॉ.गगन मलिक, मा.मंत्री, राजेंद्र पाल गौतम दिल्ली तथा राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेस जाती विभाग, आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी महाराष्ट्राच्या प्रख्यात आंबेडकरी गायिका कडुबाई खरात यांचा भीमगीताचा दणदणीत कार्यक्रम होणार आहे .या परिषदेला परभणी जिल्ह्यातील नागरिक व महिला मंडळ उपासक वर्गाने पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे मुख्य आयोजक डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केले आहे.
प्रति,
मा. संपादक
जिल्हाप्रतिनिधी साहेब
कार्यालय …परभणी.


