पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील पेठ शिवणी येथे मागील खूप दिवसापासून शासनाच्या दोन दोन पाणीपुरवठा योजना गावांमध्ये सुरू आहे 65 गाव नळ योजना व जल घर घर मिशन योजना पण अद्यापही गावाला पाणी मिळत नाही व त्या योजनेचे काम बोगस असल्याचे जनतेतून बोलले जात होते . याच पार्श्वभूमीवर आ.रत्नाकर गुट्टे यांनी पेठशिवणी येथे पाणीपुरवठा योजनेची केली पाहणी
शासनाच्या लाखो रुपयांच्या योजना येत आहेत पण त्या फक्त कागदपत्रे असल्याचे दिसून येत आहेत आणि काही योजना आहेत त्यांचे काम व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येत आहे त्यासाठी गंगाखेड विधानसभाचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी स्वतः सर्व गावातील फिरून कामाची पाहणी केली व अधिकारी व या योजनेमध्ये गुत्तेदार यांना चांगलेच धारेवर धरले. व अधिकाऱ्याला जे योजनेमध्ये ईस्टिमेट आहे त्याचप्रमाणे गावातील सर्व काम झाले नसल्यास मी कोणालाही सोडणार नाही असे ते म्हणाले गावाच्या विकासासाठी शासन एवढ्या स्कीम देत आहे व लाखो रुपये खर्च करत आहे आणि यासाठी तुम्हाला पगार दिला जातो तरीपण कामामध्ये तुम्ही टक्केवारी खात आहात आणि तुम्ही बोगस काम करत असाल तर तुमची गाठ माझ्याशी आहे असे त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडसावले .
पालम तालुक्यातील मोठे गाव व जास्त लोकसंख्या असलेले गाव आहे पण या गावाला अद्यापही पाणी मिळत नाही यासाठी नागरिकांना 500 रुपये महिना असे प्रायव्हेट बोरच्या पाण्यासाठी 500 लिटरच्या सिंटेक्स टाकी साठी दीडशे रुपये मोजावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या कामाबाबद आनेकानी तकार केल्या
मुळे आमदार गुट्टे यांनी थेट गावामध्ये येऊन पाहणी केली.व गावकऱ्यासोबत चर्चा केली. या वेळी गावकऱ्यांनी काम कशा पध्दतीने होत आहे व या कामावर लक्ष देत नाही असेही गावातील नागरिक बोलत व्यत्त केले. नागरिकांचे बोलणे ऐकून घेत आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी कर्मचारी व गुत्तेदार यांना धारेवर धरले