Author: Lok Sanchar

परभणी,(प्रतिनिधी) : अवैधरित्या उत्पादित होणार्‍या गावठी दारू, त्याचप्रमाणे बनावट व परराज्यातून कर बुडवून येणार्‍या देशी व विदेशी दारू विरुध्द पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाद्वारे संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. श्री विजय सूर्यवंशी यांनी नांदेड परिक्षेत्रातील उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात घेतला. याप्रसंगी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी मागील दोन महिन्यांत दारूबंदी संदर्भात पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नांदेड परिक्षेत्रातील पोलिसांनी मागील दोन महिन्यात, गावठी दारूचे गाळप रोखण्याकामी एकूण 5 मासरेड आयोजित केल्या होत्या. यात, पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी करून, गावठी…

Read More

पाथरी,(प्रतिनिधी) : पाथरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती निर्मला उत्तमराव विटेकर यांनी गुरुवारी (दि.24) उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीमती विटेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्या संदर्भात हालचाली सुरु केल्या. गुरुवारी गुरुपुष्यामृताचा योग साधून पाथरी तहसील कार्यालयात दुपारी 2 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे समवेत आमदार राजेश विटेकर, माजी आमदार हरिभाऊ लहाणे, भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. केदार खटींग, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, पाथरी कृउबाचे सभापती अनिल नखाते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या श्रीमती भावना नखाते, सुभाष आंबट पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

Read More

डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन व ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परभणी ( प्रतिनिधी)पूर्णा तालुक्यातील कोल्हेवाडी ग्रामस्थांचा रस्ता दुरुस्तीसाठी विधानसभा मतदानावर बहिष्कार  टाकण्याच्या निर्णयाचे गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 30 वाजेच्या सुमारास डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पूर्णा तालुक्यातील कानडखेड ग्राम पंचायतीतील कोल्हेवाडी येथील पायाभूत सुविधा विशेषतः रस्त्यासाठी मागील अडीच ते 3 महिने आंदोलने आणि पाठपुरावा करून सुद्धा कोल्हेवाडी येथील रस्ता तयार करण्यात न आल्याने कोल्हेवाडीचे गांवकरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन देण्यात आले. या बहिष्काराला डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया संघटनाने पाठिंबा दिला आहे. निवेदनावर गजानन नरहरी पवार , केरबा पवार , चंद्रकांत…

Read More

परभणी ( प्रतिनिधी) ९६ परभणी विधानसभा निवडणुक अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या कक्षास निवडणुक खर्च निरीक्षक श्री राहूल मिश्रा (आय.आर.एस.) यांनी भेट दिली. निवडणूक कामकाज कक्षास भेट देऊन संपूर्ण कामकाजाचा त्यांनी घेतला आढावा सर्व कक्षातील निवडणूक कामे नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी यांनी त्यांना माहिती देन्यात आली व सर्व कक्षास भेटी दिल्यानंतर कामकाज पाहून समाधान व्यक्त केले. त्यांच्या समवेत अप्पर जिल्हाधिकारी श्री. डॉ. प्रताप काळे, श्री. जनार्धन विधाते, निवडणुक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. संदीप राजपुरे, ना . त. गणेश चव्हाण, ना. त. अनिता वडवळकर, सी व्हीजिल कक्षाचे नोडल अधिकारी श्री. राकेश गर्जे आदी उपस्थित होते.. सी-व्हिजिल ॲपवर एक…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज पाथरी येथील तहसिल कार्यालयास भेट देऊन निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणूक कामकाजाचा आढावा घेऊन महत्त्वपूर्ण सूचना केल्या. निवडणूक कामामध्ये थोडाही हलगर्जीपणा होऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, विविध कक्षांमार्फत करण्यात येत असलेल्या निवडणूक कामकाजाबाबत जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पाथरीचे तहसीलदार शंकर एन. हांदेशवार, मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड उपस्थित होते. ***

Read More

परभणी,( प्रतिनिधी) :- आज गुरुवार, दि 24 ऑक्टोबर 2024 रोजी वितरण केलेले नामनिर्देशन पत्र व उमेदवारांनी दाखल केलेले नामनिर्देशन पत्राची माहिती मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे- 95- जिंतूर विधानसभा मतदारसंघ – 38 उमेदवारांनी 66 अर्ज घेतले. तर विजय माणिकराव भांबळे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) यांनी 2 नामनिर्देशन पत्र, कृष्णा त्रिंबकराव पवार यांनी ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टीच्यावतीने एक व अपक्ष म्हणून एक नामनिर्देशन पत्र आणि सुखदेव उध्दव भांबळे (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. 96- परभणी विधानसभा मतदारसंघ – 11 उमेदवारांनी 22 अर्ज घेतले. तर ॲड अफजल बेग (अपक्ष), विजय अंबादासराव वरपुडकर यांनी भारतीय जनता पार्टीच्यावतीने एक व अपक्ष म्हणून एक नामनिर्देशन…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान सोशल मिडीयामधून आक्षेपार्ह मजकुर, फोटो, व्हिडीओ वगैरे गोष्टी व्हायरल झाल्यास संबंधित व्यक्तीसह ग्रूप अ‍ॅडमीनला जबाबदार ठरविले जाईल, असा इशारा जिल्हा पोलिस दलाने दिला आहे. पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मिडियासंबंधी काही सूचना जाहीर केल्या आहेत. त्यात कोणत्याही उमेदवाराशी संबंधित त्याचे वैयक्तिक, कौटूंबिक, सामाजिक स्तरावर अवहेलना होईल असे आक्षेपार्ह टिका टिप्पणी करणे, मजकुर, फोटो, व्हिडीओ करुन प्रसारित करणे, अथवा आलेल्या संदेशावर आपले आक्षेपार्ह मत प्रगट करणे व पुढे पाठविणे, मतदाराचे मत वळविण्यासाठी कोणत्याही धर्माच्या लोकांच्या धार्मिक, भाषिक तसेच जातीद्वेष पसरविणारे आक्षेपार्ह मजकुर, फोटो व्हिडीओ प्रसारित करणे, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा होईल या प्रकारचे स्वतंत्र…

Read More

परभणी, (प्रतिनिधी): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, 2024 चा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असुन 96-परभणी मतदार संघाअंतर्गत मतदान 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या ई-पीक म्हणजेच मतदार फोटो ओळखपत्र आणि इतर 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा मतदारांना मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना दाखविल्यानंतर मतदारांना मतदार करता येणार आहे. आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजने अंतर्गत जारी केलेले विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेव्दारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम पब्लिक लिमिटेड…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सायंकाळी जागा वाटप निश्‍चित झाल्या त्यानंतर राज्यातील काही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली  यात परभणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील यांची व गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांची पक्षश्रेष्ठींनी बुधवारी (दि.23) जाहीर केली. महाविकास आघाडीतून परभणीची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या हिश्श्यास जाणार हे स्पष्ट होते. परंतु, गंगाखेडातून महाविकास आघाडीतून शिवसेनेस की अन्य कोण्या मित्र पक्षास जागा बहाल होईल, या बाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, महाविकास आघाडीने परभणी व गंगाखेड हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदरात टाकले. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी बुधवारी सायंकाळी जागा वाटप निश्‍चित…

Read More

सेलू ( प्रतिनिधी)कथा ही सांगायची नसते. या हृदयातून ती त्या हृदयात पोहोचवायची असते. छोट्या पडद्यावर व प्रत्यक्ष कथा ऐकणे यात फरक आहे. संपूर्ण ऊर्जा मिळवायची असेल तर कथाही कथा मंडपात ऐकल्याशिवाय संपूर्ण ऊर्जा मिळू शकत नाही. कारण उत्तम कथेतून ऊर्जा प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले आहे. बुधवारी, २३ ऑक्टोबर रोजी महाआरती व महाप्रसादाने नऊ दिवसांच्या रामकथेची उत्साहात सांगता झाली. नूतन विद्यालयाच्या हनुमानगढ परिसरात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराजांच्या अमृतवाणीतून १५ ते २३ ऑक्टोबर दरम्यान कथेचे आयोजन करण्यात आले होते. नवव्या दिवशी व्यासपीठावर श्रीसालासरजी (भक्त हनुमान) प्रतिकृती उभारण्यात आली होता. स्वामीजी म्हणाले…

Read More