Author: Lok Sanchar

परभणी, ( प्रतिनिधी) आज सोमवार, दि 28 ऑक्टोबर 2024 रोजी वितरण केलेले नामनिर्देशन पत्र व उमेदवारांनी दाखल केलेले नामनिर्देशन पत्राची माहिती मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे- 95- जिंतूर विधानसभा मतदारसंघ – 10 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले. तर समीरराव गणेशराव दुधगावकर (अपक्ष), प्रेक्षा विजय भांबळे (अपक्ष), डॉ. प्रभाकर रंगराव बुधवंत यांनी अपक्ष व राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने प्रत्येकी एक, शेख सलीम शेख इब्राहीम (ऑल इंडिया मजलीस ई इन्कनाब ई मिलत), मेघना दिपक साकोरे बोर्डीकर (भाजप), राजीव किसनराव पंचागे (अपक्ष), मुंजाजी साहेबराव कदम (अपक्ष), अंकुश सिताराम राठोड (अपक्ष), प्रसाद ज्ञानेश्वर काष्टे (अपक्ष), गणेश जगन्नाथ काजळे (अपक्ष), सुरेश कुंडलीकराव नागरे यांनी अपक्ष व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रत्येकी…

Read More

जिंतूर,(प्रतिनिधी) जोरदार शक्तीप्रदर्शन करीत जिंतूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सोमवारी (दि.28) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह अन्य हजारो कार्यकर्त्यांसह आमदार सौ. साकोरे-बोर्डीकर यांनी जिंतूरातून सकाळी रॅली काढली. या रॅलीत माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, माजी आमदार हरिभाऊ लहाणे यांच्यासह गंगाधर बोर्डीकर व अन्य नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत सौ. मेघना साकोरे यांनी जिंतूर व सेलू या विधानसभा मतदारसंघात पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीनेही प्रयत्न केले आहेत. गेल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत विकासाचा आणि नागरीकांच्या उन्नतीचा अजेंडा आपण सातत्याने…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : परभणी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत तथा शिवसेनाचे उमेदवार आनंद भरोसे यांनी सोमवारी (दि.28) रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनामहायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून भरोसे यांनी रविवारी मध्यरात्री परभणीत दाखल होताच सोमवारी सकाळी मोठ्या रॅली च्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला. येथील शनिवार बाजारातून सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी एका उघड्या जीपवर भरोसे यांच्यासह शिवसेनेचे नेते माजी खा.सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव शिंदे,नेते प्रविण देशमुख, महानगरप्रमुख नितेश देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष भास्करराव लंगोटे, केशवराव कदम, माजी जिल्हाध्यक्ष राजू कापसे, महिला आघाडीच्या गीता सूर्यवंशी, माजी नगरसेवक शिवाजीराव भरोसे, कृष्णा भरोसे, राजू शिंदे,पंजाबराव देशमुख,सुरेश काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शंकरराव भागवत,भारतीय…

Read More

परभणी (प्रतिनिधी) महाविकास आघाडी तसेच शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे परभणी विधानसभेचे आ. डॉ.राहुल पाटील हे मंगळवारी ( दि.29)राजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी यूवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थितीत राहणार आहे. शहरातील शनिवार बाजार मैदान येथून सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. अर्ज दाखल प्रसंगी खा. संजय जाधव, खा. फौजीया खान, आ. सुरेश वरपूडकर, माजी आ. विजय गव्हाणे यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.आ. डॉ. राहुल पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली. मंगळवारी सकाळी ११ वाजता शनिवार बाजार येथून रँली निघणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे रॅलीत सहभागी…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी दि.28 ऑक्टोबर ते दि.3 नोव्हेंबर या कालावधीमध्ये दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणीच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातुन राष्ट्र समृध्दी या संकल्पनेनुसार पार पाडण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार दि.28 ऑक्टोबर रोजी सकाळी सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयामध्ये भ्रष्टाचारनिर्मुलनाबाबत शपथ घेवुन राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमीत्त दिलेल्या संदेशाचे वाचन करून जनजागृतीला सुरूवात करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणी कार्यक्षेत्रामधील सर्व…

Read More

परभणी (प्रतिनिधी) परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा ब्राह्मण समाजाला निश्चित फायदा होईल असे प्रतिपादन परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी केले. परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजासाठी नुकतेच महायुती सरकारने स्थापन केले. या महामंडळाच्या अध्यक्षपदी आशिष दामले यांची निवड करण्यात आली. त्यानिमित्त परभणी येथे ब्राह्मण समाज बांधवांचा ‘संवाद मेळावा’ भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल पिंगळकर यांनी आयोजित केला होता.. समाजातील सर्व घटकांनी ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी मोठे योगदान दिले आहे. या पुढे समाजातील युवक v युवती शिक्षण व व्यवसाय उभे करून आर्थिक सक्षमता कशी येईल यासाठी काम करणार असल्याचे सांगितले..या कामी सर्व समाज एकजुटीने काम करेल,…

Read More

परभणी( प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, व जिल्हा बॅडमिंटन संघटना परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेचे आज सकाळी 11 वाजता माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक  रवींद्र सिंह परदेशी यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले. या स्पर्धेसाठी परभणी जिल्हा सेटल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष  विजयसिंह जामकर व सचिव माननीय  रवींद्र पतंगे हे ही उपस्थित होते. या स्पर्धेसाठी आलेले राज्याचे निवड समिती सदस्य  चंद्रहास कान्हेरे, सातारा व  मल्हार कुलकर्णी, अहमदनगर व परभणी जिल्ह्याचे बॅडमिंटन क्रीडा मार्गदर्शक श्री उन्मेष गाडेकर व स्थानिक पंच म्हणून विकास जोशी, स्वरूप सोनिक, अजिंक्य गाडेकर, सुमित…

Read More

परभणी ( प्रतिनिधी)परभणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने उबाठा गटाचे उमेदवार आ.डॉ. राहुल पाटील यांना विविध समाज, संघटना पदाधिकारी यांची साथ लाभत असून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. यात अनुषंगाने आर्य वैश्य समाज,परभणी तालुका फर्टीलायझर्स अँड पेस्टिसाइड असोसिएशन, परभणी जिल्हा आरओ वॉटर असोसिएशन च्या पदाधिकारी, अधिकारी यांनी आ. पाटील त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी डॉक्टर विवेक नावंदर अनिल डहाळे अरविंद देशमुख रवी पतंगे अध्यक्ष सुधीर पाटील, सचिव सुरेश कत्रूवार, प्रसाद दमकोंडे, अमोल फुटाणे, सुनील पत्तेवार, विराज वट्टमवार, सुहास कोकडवार, स्वप्निल पदमवार, व्यंकटेश वडगावकर, हरीश कोकडवार ,अध्यक्ष अजय राव देशमुख उपाध्यक्ष खुर्रम आलम, सचिव इरफान सिद्दिकी, संजय कोळी, शेख जाकीर, श्याम खेत्री, प्रकाश…

Read More

गंगाखेड,(प्रतिनिधी) : गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मंगळवार 29 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता ते गंगाखेडातील गोदाकाठावरील बालाजी मंदिरपासून पदयात्रेद्वारे उमेदवारी अर्ज भरण्याकरीता निघणार आहेत. श्रीराम चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत ही पदयात्रा निघणार असून त्याद्वारे गुट्टे हे तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विजय संकल्प सभा होणार असल्याची माहिती गुट्टे समर्थकांनी दिली.

Read More

परभणी ( प्रतिनिधी)विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे परभणी विधानसभेचे उबाठा गटाचे उमेदवार म्हणून आ.डॉ.राहुल पाटील  मंगळवारी (दि.२९)रोजी परभणी विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करणार असून यावेळी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आ. डॉ.राहुल पाटील यांनी दिली. शनिवारी ( दि26) आ.डॉ.राहुल पाटील यांच्या संपर्क कार्यालयातील बैठकीस आ.डॉ.राहुल पाटील व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. मंगळवारी (दि.२९)रोजी परभणी विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली. बैठकीस कृ.ऊ.बा.सभापती पंढरीनाथ घुले, यांच्यासह युवासेना, शिवसेना, महिला आघाडी, दलित आघाडीसह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळीं…

Read More