परभणी /प्रतिनिधी – भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या जन्म शताब्दी महोत्सवानिमित्त श्री सत्यसाई सेवा संघटनेच्यावतीने आज पौर्णिमा आडगावकरचा भक्ती गीतांचा कार्यक्रम परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवारी दिनांक ११ रोजी सायंकाळी ६.३० वाजता गायिका पौर्णिमा चौधरी- आडगावकर यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रमात एकापेक्षा एक सादर केलेल्या भक्तीगीताना परभणीकरानी टाळ्याव्दारे उत्स्फूर्त प्रतिसादात रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.
भक्ती संगीताच्या माध्यमातून केलेली उपासना म्हणजे ” नाद उपासना ” भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या कृपाशीर्वादाने भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्ष महोत्सवा निमित्त श्री सत्यसाई सेवा संघटना परभणी वतीने “मानस भज रे गुरु चरणम्” हा “भक्ती गीतांचा” जिल्हास्तरीय संगीत समारोह सामूहिक साधना आयोजित करण्यात आला होता. गायिका पौर्णिमा चौधरी- आडगावकर हिने ” तुझं मागतो मी आता”हे भक्तीगीत सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली. माय भवानी, तुझे लेकरू,कुशीत तुझिय, येई सेवा मानून घे आई तू हे गीत सादर करीत श्रोत्यांची दाद मिळवली.
ओंकारा, वंदना वंदन हे ज्ञानेश्वर हे भक्तीगीत सादर केले.तर लोकप्रिय गायिका स्व.माणिक वर्मा यांनी स्वरबद्ध केलेलं, कबीराचे विणतो शेले,कौसल्येचा राम, भाबड्या या भक्तासाठी देव करी काम एक एकतारी हाती, भक्त गाई गीत एक एक धागा जोडी जानकीचा नाथ राजा घनश्याम ! हे पौर्णिमा आडगावकरने हुबेहुब सादर करीत उत्स्फूर्त दाद मिळवली. चंदनासी परिमळ, आम्हा काय त्याचे ? या गीताने रसिकांना मंत्रमुग्ध करून जोडोनिया धन उत्तम व्यवहारे हे गीत सादर केले. “क्षणभर, उघड नयन देवा!” या गीतातून आर्त हाक देत “संत भार पंढरीत” हे भक्तीगीताने मने जिंकली. “पतित तूं पावना । म्हणविसी नारायणा, तरी सांभाळी वचन । ब्रीद वागविशी जाण, याती शुद्ध नाहीं भाव । दुष्ट आचरण स्वभाव” या पाठोपाठच जन्मदिया तुने साई को ही प्रार्थनाच गायली. सद्गुरु हो महाराज या गीताने सांगता केली.परभणीतील आघाडीचे गायक मा.डॉ. कृष्णराज लव्हेकर यांनी हार्मोनियमवर साथ संगत केली.तर तबला साथ श्री विशाल धानोरकर सिंथवर श्री कृष्णा सिंगारे यांनी चांगली साथसंगत केली.या भक्ती संगीत कार्यक्रमाचे उत्कृष्ठ निवेदन डॉ. विजयसाई शेळके यानी केले. प्रास्ताविक अध्यात्मिक समन्वयक डॉ .ए.एल .शेळके यांनी केले.श्री सत्यसाई सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. वसंतराव लांडे समितीकडून राबविण्यात येणारे उपक्रम याबद्दल सविस्तर अहवाल दिला.
कार्यक्रम यशस्वितेसाठी समिती प्रमुख सारंग चौधरी,जिल्हा अध्यात्मिक समन्वयक बी. एन. शिंदे बलसेकर , दत्ता बनसोडे, एम. पी जुमडे , बि. एन. आळसे श्री देवठाणकर , माधव मस्के संतोष दडके विष्णु मोपकर प्रल्हाद माळेकर व समितीच्या महिला विभागातील सौ. जगदेवी शेळके सौ. ललिता लांडे सौ राजश्री दडके व इतर अनेक समिती सदस्यानी प्रयत्न केले.याकार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सौ.राजश्री दडके यांनी केले. या कार्यक्रमास परभणी शहरातील रसिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.