पालम (प्रतिनिधी ) होळी आणि धुलीवंदनच्यापार्श्वभूमीवर पालम शहरासह तालुक्यात पोलिसांचा बंदोबस्त या सणानिमित्त पालम तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस अधिकारी 5 पोलीस कर्मचारी 30 होमगार्ड 29 यांना बंदोबस्त कामी सतर्क ठेवले आहे.
पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांच्या मार्गदर्शना खाली होळी आणि धुलीवंदनच्या अनुषंगाने विविध ठिकाणचा बंदोबस्त निश्चित करण्यात आला.नागरिकांनी तसेच तरुणाईने होळी, धुलीवंदनचा सण उत्साहात आणि शांततेत साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांनी केले. शहर सह तालुक्यासह विविध हद्दीत गस्त आणि अवैध व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी पथके तैनात केली आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन धारकांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुद्धा केली जाणार आहे.