परभणी (प्रतिनिधी ) परभणी जिल्ह्यातील पिकांची अवस्था बिकट होत असल्याने पैठण डावा कालवा व माजलगाव उजवा कालवा वरील कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी काल विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या द्वारे केली होती, त्यास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्या सकाळीच कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाणी सोडण्याबाबत निर्देश देण्यात येतील असे सांगितले होते,
त्याप्रमाणे सकाळी साडेदहा वाजता विधान भवन कक्षात बैठक झाली, त्यात जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी उद्यापासूनच पैठण डावा कालवा व माजलगाव उजवा कालव्या पाणी सोडण्यात यावे , शेतकऱ्यांची पिके जगविण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले त्याप्रमाणे पैठण डावा कालवा क्षेत्रातील कालव्या तून उद्यापासून पाणी सोडण्यात येणार आहे तर माजलगाव कालव्यात पाणी सोडण्यासाठी माजलगाव धरणातच पाण्याची पुरेशी उपलब्धता नसल्याने अडचण निर्माण होणार असल्याचे निदर्शनास आल्याने जायकवाडी धरणातून माजलगाव धरणातही पाणी सोडण्याची सुरुवात ही उद्यापासूनच करण्यात येईल, त्यानंतर ते पानी उजव्या कालव्यात सोडण्यात येईल असे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले. जवळपास एक ते दीड महिना ही पाणी पाळी चालू राहील, त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असून त्यांची पिके त्यामुळे जागवण्यासाठी मोठा आधार होऊ शकेल असा विश्वास आमदार राजेश विटेकर यांनी व्यक्त केला , सोबतच परभणी जिल्ह्यातील डिग्रस, मुळी, खड्का, मुदगल, तारु गव्हाण, ढालेगाव या बंधाऱ्यात ही पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आ विटेकर यांनी यावेळी केली , त्याबाबतचा अहवाल कार्यकारी संचालक यांनी पाठवावा सदरील बंधाऱ्यात सुध्दा पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हणाले
या बैठकीस आ प्रकाश दादा सोळंके, आ रत्नाकर गुट्टे, आ राहुल पाटील, आ हिकमत दादा उढाण यांच्या सह जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव, सचिव, गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक तसेच इतर कार्यकारी अभियंता व अधिकारी अधिकारी यांची उपस्थिती होती