हेंडगे कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत करावी
परभणी: (प्रतिनिधी) येथील पूर्णा तालुक्यातील हट्ट्या जवळील हाय टेक निवासी शाळेतील मुजोर संस्था चालक प्रभाकर चव्हाण यांना कडक शासन व्हावे. पीडित हेंडगे कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत द्यावी. आरोपींचे सर्व बँक खाते फ्रीज करण्यात यावे. महाराष्ट्रातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेकडून फीसमुळे विद्यार्थ्यांची कागदपत्रांची आडून होऊ नये यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी तसेच शिक्षण मंत्र्यांनी उपाययोजना कराव्यात. परभणी जिल्ह्यात देखील इतर कॉलेज कडून टि.सी. साठी विद्यार्थ्याना मानसिक त्रास दिला जातो असा आरोप विद्यार्थी नेते सिद्धार्थ पानबुडे यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक संस्थेकडून कोणत्याही कारणामुळे कागदपत्रांची अडवणूक करू नये अन्यथा आज पालकाला जीव गमवावा लागला उद्या विद्यार्थी या पैश्यावाल्याना बळी जाईल. अशा अन्य मागण्यासह जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना विद्यार्थी संघटनेचे निवेदन. यावेळी विद्यार्थी नेते सिद्धार्थ पानबुडे, रितेश देशमुख, बोधिसत्व साळवे, सागर पानबुडे, संतोष बोरकर, राहुल बोकन आदींच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.