परभणी (परभणी) परभणी जिल्ह्यात मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा बट्ट्याबोळ उडाला आहे. शेतकरी सहा महिन्यांपासून पैसे भरून कृषी पंपासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. परंतू शासन गोलमोल उत्तर देत आहे अशा शब्दात आ.डॉ.राहुल पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात गुरूवार, दि.१७ जुलै रोजी लक्षवेधीद्वारे आक्रमक भूमिका घेतली.
विधानसभेच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधीद्वारे आ. डॉ. पाटील यांनी परभणी जिल्ह्यातील वीज समस्येबाबत आवाज उठवला. सौर कृषी पंप योजनेमध्ये सहा महिन्यांपूर्वी २५ हजार ९४२ शेतकºयांनी पैसे भरले. शेतकरी कृषी पंपासाठी कार्यालयात चकरा मारत असून शासनाकडून फिरवा फिरवीची उत्तरे दिली जात आहेत. यात शेतकºयांची चूक काय? असा सवाल करत सहा महिन्यांपूर्वी घेतलेल्या पैशाचे व्याज सरकार देणार का? कृषी पंपाअभावी झालेली नुकसान भरपाई सरकार देणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत सरकारला धारेवर धरले. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये अपुºया लाईनमन, वीज कर्मचाºयांच्या प्रश्नावर देखील सरकारला खडे बोल सुनावले. जिल्ह्यातील ८५४ गावात केवळ ५३९ कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे विजेच्या समस्या निर्माण होत आहेत. उर्वरित गावात वीज कर्मचाºयांची रिक्त पदे कधी भरणार असा सवाल सरकारला केला. परभणी जिल्ह्यात महावितरणची ११ युनिट २०१० पासून बंद पडली आहेत. ही युनिट पुनर्जीवित करणार का? त्यासोबतच परभणी जिल्ह्यामध्ये १०० रोहित्र बंद झाली आहेत.रोहित्र नसल्यामुळे परभणी शहरात विजेच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. सरकारने याकडे गांभीर्याने पहावे असे देखील आ. पाटील म्हणाले.
ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आ. पाटील यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना सांगितले की, परभणीत २६ हजार २७५ लोकांनी कृषी पंपासाठी पैसे भरले. १५ हजार ७७२ लोकांनी एजन्सी निवडली, तर ९ हजार ९६१ लोकांना कृषी पंप दिले. ८१८ शेतकºयांनी पैसे भरून सहा महिने झाले आहेत. परंतू त्यांना संबंधीत कंपनीकडून कृषीपंप देण्यात आले नाहीत. त्यामुळे संबंधित कंपनीकडून दहा टक्के नुसार पैसे वसूल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच मागणी केलेल्या सर्व शेतकºयांना आॅगस्ट अखेरपर्यंत कृषी पंप देण्यात येतील. याशिवाय बंद पडलेले ११ युनिट सुरू करण्यासह रिक्त कर्मचाºयांच्या भरती प्रक्रीयेच्या मागणीला राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सभागृहात लगेचच मान्यता देवून तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन आ. पाटील यांना दिले.
राज्यात आशावर्कर, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका ह्या अनेक वर्षांपासून विविध विभागाचे काम करतात. त्यांना मानधन कमी आहे. निवृत्तीनंतर मिळणाºया कुठल्याही लाभाची तरतूद नाही तसेच विमा कवच नाही. त्या अनुषंगाने त्यांना पगारवाढ, रिटायरमेंट बेनिफिट व विमा कवच देण्यात यावे अशी मागणी आ.पाटील यांनी केली. बालमृत्यू व मातामृत्यू कमी करण्यासाठी आपण सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. मात्र परभणी जिल्हा महिला रुग्णालयात फक्त एकच व्हेंटिलेटर असून शासनाने रूग्ण संख्या पाहून आधिकचे साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी निधी द्या*
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रीशताब्दी जन्म महोत्सव वर्ष देशभर साजरे करण्यात येते आहे. यानिमित्ताने सरकार देशभर विविध चांगल्या योजना राबवित आहे. या पार्श्वभुमीवर परभणी शहरात देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक व्हावे अशी जिल्ह्यातील नागरीकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी राज्य सरकारने परभणीत भव्य दिव्य स्मारक उभारणीसाठी लवकरात लवकर निधी द्यावा अशी मागणी आ.पाटील यांनी अधिवेशनात केली.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


