परभणी, (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी.हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीने महिलांसाठी रविवार दि.16 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता मोफत सर्व रोग निदान तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आ.डॉ.राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून परभणी मेडिकल कॉलेज येथे सातत्याने आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे,आता महिला दिनानिमित्त परभणी मेडिकल कॉलेज आर.पी. हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीने महिलांसाठी सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये कर्ण तपासणी, रक्तदाब, पल्स तपासणी, सीबीसी तसेच रक्तातील सर्व तपासण्या अस्थिरोग, हाडातील ठिसूळता तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी, फिजिओथेरपी या सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. या तपासणीत ज्या महिलांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे अशा सर्व महिलांची तपासणी करून अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या आर.पी. हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिराला येण्यासाठी महिलांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली असून जिंतूर रोडवरील नूतन विद्या मंदिर आणि शिवाजीनगर येथील आमदार डॉ.पाटील यांचे संपर्क कार्यालय येथे सकाळी नऊ ते 11 या दरम्यान बस उपलब्ध राहणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ.संप्रिया राहुल पाटील महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमीर तडवी यांनी केले आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


