परभणी (प्रतिनिधी ) एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ, मुंबई संलग्नित तथा स्व’.कौशल्याबाई दुधगांवकर सेवाभावी संस्था, दुधगांव द्वारा संचलित *वसुंधरा महिला महाविद्यालय टाकळी (कुं) ता.जि. परभणी* येथे दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश वाकळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शिक्षण, स्त्री-स्वातंत्र्य व सामाजिक समतेसाठी केलेल्या कार्याला व प्रतिमेला अभिवादन केले.
“अंधारातून प्रकाशाकडे नेणारी शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले,
स्त्री-पुरुष समानतेची बीजे पेरणाऱ्या सावित्रीबाई फुले!”
अशा काव्यात्मक शब्दांतून सावित्रीमाई फुले यांच्या कार्याचा परिचय अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य वाकळे यांनी करून दिला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.अशोक गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रा.ऋतुजा दुधगावकर मॅडम, प्रा.एल.आर. पत्रे, श्री. एन. जी. महाजन, श्री. एस. बी. खानापुरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम.एस.उफाडे, व्ही. आर. घनसावंत यांनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमला विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी म्हणून शिल्पा खोडवे, उषा काळे उपस्थित होत्या. कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार करून सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करण्याचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली काळे व आभार स्वाती चव्हाण यांनी केले.


