परभणी ( प्रतिनिधी ) राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2026 व पोलिस रेजिंग डेच्या अनुषंगाने, परभणी पोलिस दलाच्या शहर वाहतूक शाखेच्यावतीने परभणी शहरात हेल्मेट मोटारसायकल रॅली यशस्वीरीत्या संपन्न झाली.
ही रॅली आज सकाळी 09.30 वाजता राजगोपालचारी उद्यान येथून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पोलीस अधीक्षक कार्यालय येथे समाप्त झाली. रॅलीत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह पोलिस अधिकारी, अंमलदार तसेच नागरिकांनी हेल्मेट परिधान करून सहभाग नोंदवला.
या उपक्रमातून रस्ता सुरक्षा व हेल्मेट वापराचे महत्त्व नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आले.


