पालम (प्रतिनिधी) अँग्रीस्टॅक हा केंद्र शासनाचा एक महत्वाकांक्षी उपक्रम असुन, याव्दारे प्रत्येक शेतक-याला विशिष्ट ओळख क्रमांक (फार्मर आयडी) मिळणार आहे. याची नोंदणी तलाठी, कृषी सहाय्यक, सेतु चालक यांचेकडे चालु असुन, सदर नोंदणी मोफत असल्याने, तालुक्यातील सर्व शेतक-यांनी लवकरात लवकर करुन घ्यावी, असे आवाहन तहसिलदार श्री कैलासचंद्र वाघमारे यांनी केले आहे.
तालुक्यात एकुण सुमारे 45000 शेतकरी असुन त्यापैकी आज पावेतो सुमारे 16000 शेतक-यांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक गावात ग्रामपंचायतीचे संगणक चालक, सेतु चालक (CSC) यांचे स्तरावर ही नोंदणी चालु आहे. यासाठी स्वतः शेतक-यांनी आपले फक्त आधार कार्ड जायचे आहे. या फार्मर आयडीचा पिक कर्ज, पिक विमा, नैसर्गिक आपती अनुदान, नाफेड खरेदी अशा विविध बाबीचा लाभ घेण्यासाठी होणार आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावात नोंदणी शिबीरे आयोजीत करण्यात आले असुन तहसिलदार कैलासंचद्र वाघमारे यांनी स्वतः बनवस, चाटोरी येथील शिबीरात हजेरी लावली आहे. यामध्ये ही नोंदणी मोफत असतांना यासाठी पैसे घेणा-या बनवस येथील एका सिएससी केंद्राचा निंलबनाचा प्रस्ताव तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. सदर मोहीमेची नोंदणी वाढण्यासाठी तहसिलदार श्री कैलासचंद्र वाघमारे यांनी सर्व तलाठी, मंडळ अधिकारी,कृषी अधिकारी,ग्रामसेवक यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत.
या बैठकीस तहसिलदार श्री कैलासचंद्र वाघमारे यांचेसह गटविकास अधिकारी श्री उदयसिंग सिसोदे, नायब तहसिलदार राजेश्वर पवळे,नायब तहसिलदार श्री तेलभरे, अव्वल कारकुन शेख इसरार,महसूल सहायक शेख इमरान इत्यादी, हजर होते.