परभणी,(प्रतिनिधी) : परभणी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी व महायुतीच्या तूल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवारांसह अन्य छोटे पक्ष व अपक्ष असे एकूण 46 इच्छुकांचे 59 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या मतदारसंघातील विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून तर त्यांचे प्रतिस्पर्धी आनंद भरोसे यांनी महायुतीतून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत म्हणजे अंतीम मुदतीपर्यंत एकूण 46 इच्छुकांनी 59 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत एकूण 93 इच्छुकांनी 150 उमेदवारी अर्ज खरेदी केले होते. मंगळवारी 12 इच्छुकांना 13 उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले होते. मंगळवारी 22 इच्छुकांनी 26 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, अली…
Author: Lok Sanchar
परभणी, (प्रतिनिधी): जिल्हा कोषागारामार्फत निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी नोव्हेंबर महिन्यात हयात दाखला सादर करणे आवश्यक आहे. हयात दाखला नोंदविण्यासाठी बँकेत यादी पाठविली असून, तो बँकेत सादर करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दत्ता भांगे यांनी केले आहे. निवृत्तीवेतन सुरु ठेवण्याकरिता 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी प्रत्यक्ष बँकेत उपस्थित राहून यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरीच्या रकान्यात स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा उमटवावा तसेच कार्यरत मोबाईल क्रमांक, पुनर्विवाह व पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती नोंदवावी या पद्धतीशिवाय बायोमॅट्रीक्स पद्धतीने जीवन प्रमाण दाखला देण्याकरीता http://jeevanpraman.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे. या यादीत स्वाक्षरी अथवा अंगठा अथवा ऑनलाईन जीवन प्रमाण…
परभणी, ( प्रतिनिधी) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि इंडियन सोसायटी ऑफ ग्रीकल्चरल इंजिनिअर्स, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेक्स्ट-जेन डिजिटल कृषीसाठी अभियांत्रिकी नवकल्पना’ या विषयावर इंडियन सोसायटी ऑफ ग्रीकल्चरग्रीकल्चरल इंजिनिअर्सची 58 वे वार्षिक अधिवेशन आणि ‘कृषी परिवर्तनाकरिता इच्छुक युवकांसाठी कृषी अभियांत्रिकी शिक्षण’ या विषयावर 12 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात कृषी अभियांत्रिकीमधील नाविन्यपूर्ण उपाय आणि प्रगती यावर चर्चा करण्यासाठी देश-विदेशातील 500 पेक्षा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे अधिकारी व शास्त्रज्ञ, देशातील विविध राज्यातील कृषि विद्यापीठांचे कुलगुरू, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटना उद्योगांचे प्रतिष्ठित प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि शास्त्रज्ञ, उद्योजक, विविध विभागातील मान्यवर,…
परभणी,(प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा बॅडमिंटन संघटना परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत पुणे विभागाच्या संघाचे वर्चस्व राहिले. 14 वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक प्रियदर्शनी स्कूल एसएससी पुणे -पुणे विभाग, द्वितीय क्रमांक सेवा सदन सक्षम स्कूल नागपूर – नागपूर विभाग तर तृतीय क्रमांक वूडरिच हायस्कूल छत्रपती संभाजी नगर – छत्रपती संभाजी नगर विभागाच्या संघाने पटकावला. 17 वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक डीएसपी इंटरनॅशनल स्कूल रायगड -मुंबई विभाग, द्वितीय क्रमांक सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे, पुणे विभाग तर तृतीय क्रमांक सेंड जोसेफ…
परभणी ( प्रतिनिधी) धन्वंतरी जयंती व आयुर्वेद दिनानिमित्त एल आर फार्मास्युटिकल्स परभणी द्वारे आयोजित “ सर्वांसाठी आयुर्वेद” या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्र एल आर फार्मास्युटिकल्सच्या श्री मुकुंद कुलकर्णी सभागृहात दिनांक 26/10/2004 रोजी पार पडले. आजच्या या धकाधकीच्या जीवनात अनेक प्रकारचे ताण तणाव वाढत आहेत अशावेळी संपूर्ण सुरक्षित औषधींचा वापर मानव आरोग्या करिता अत्यंत उपयुक्त ठरत आहे. आपला भारत देश हा आयुर्वेदाचा जनक आहे याचे महत्त्व आता संपूर्ण जगाला समजले आहे असे विचार मानव आयुर्वेदावर मार्गदर्शन करीत असताना डॉ. कुणाल कौसडीकर यांनी मांडले. आयुर्वेदामध्ये औषधी वनस्पतींचा वापर होतो परंतु या वनस्पतींवरच येणारे आजार, रोग किंवा असे रोग येऊच नयेत म्हणून प्राचीन…
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनिल आहीरे यांनी परभणी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.. परभणी (प्रतिनिधी) परभणी विधानसभा मतदारसंघासाठी परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. अनिल हरिश्चंद्र आहिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सामान्य कुटुंबातील उमेदवाराला उमेदवारी देऊन परिवर्तन महाशक्ती चा घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख उद्धव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी, शहर चिटणीस वैभव संघई,माऊली गरुड, माणिक गरुड, सुधीर देशमुख, शेख राजू, धाराबा कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
परभणी,(प्रतिनिधी) : परभणी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे तसेच उबाटा चे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आ. डॉ. राहुल पाटील यांनी मंगळवारी (दि29) मोठे शक्तिप्रदर्शन करीत परभणीत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची रॅली तील उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. आ. डॉ. राहुल पाटील यांनी अर्ज भरण्या पूर्वी मोठया रॅली चे आयोजन केले होते.शनिवार बाजारापासून दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीच्या या संयुक्त रॅलीस प्रारंभ झाला. नानलपेठ कॉर्नर, शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभूजा चौक, आर.आर. टॉवर, नारायण चाळ चौक मार्गे रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराकडे प्रस्थान केले. या रॅलीत मोठ्या वाहनावर युवा…
परभणी, (प्रतिनिधी) :- निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती के. हरिता, निवडणूक निरीक्षक (सामान्य) संचिता बिष्णोई आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेश दुग्गल यांनी आज परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड व पाथरी विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक विषयक बाबी व कायदा सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. भारत निवडणूक आयोगाने जिंतूर व परभणी या दोन विधानसभा मतदारसंघांकरीता श्रीमती के. हरीता तर गंगाखेड व पाथरी या दोन विधानसभा मतदारसंघांकरीता़ संचिता बिष्णोई आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) म्हणून राजेश दुग्गल यांची नियुक्ती केली आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील चारही मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य…
‘स्वरमयी दिवाळी पहाट’ चे सलग तिसऱ्या वर्षी यशस्वी आयोजन परभणी ( प्रतिनिधी)अनिकेत सराफ आणि लायन्स क्लब परभणी मेन यांनी एकत्र येऊन यावर्षी ‘स्वरमयी दिवाळी पहाट’ चे दिवाळी पाडावा शनिवार 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या संगीत सभेत, सुविख्यात गायक प्रथमेश लघाटे याला आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे, लिटील चॅम्प म्हणून रसिकमनावर अधिराज्य गाजवलेले प्रथमेश हा परभणीत पहिल्यांदाच गायन करणार आहे. त्याच्या सोबत परभणीची सुपुत्री, कवि शाम यांची कन्या तर विदुषी मंजुषा पाटील कुलकर्णी यांची शिष्या रसिका पैठणकर असणार आहे उत्सवांची नगरी असा परिचय असणाऱ्या परभणी शहरात दिवाळी निमित्त काही आयोजन व्हावे आणि स्थानिकांसह, सणा निमित्त…
परभणी ( वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात असलेल्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यासाठी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये दीपावली निमित्त ग्रीटिंग कार्ड बनवले. पूर्वीच्या काळी दिवाळीनिमित्त लहान मुले मातीचे किल्ले तयार करण्यात रममाण होत असत. परंतू सध्याच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना अशा संधी मिळत नसल्याने, महाराष्ट्रातील परंपरा पुढील पिढयांपर्यंत पोहचवण्यासाठी शाळेमध्ये अप्रतिम अशी किल्याची सजावट करण्यात येऊन त्याबददल बालकांना माहिती देण्यात आली. तसेच पुर्वी दिपावलीनिमित्त मुले घरकूल तयार करुन त्यात खेळभांडी मांडून खेळत असत. त्याप्रमाणे अशा खेळण्याचा आनंद बालकांना मिळावा या उददेशाने त्यांचे बाहूली घर सजवण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य…

