पालम (प्रतिनिधी) वर्तमान स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल असा अभ्यासक्रम विद्यापीठ स्तरावर तयार झाला तर उच्च शिक्षणात तरुणांचा सहभाग निश्चित वाढेल असे प्रतिपादन श्री बळीराजा शिक्षण संस्था सोमेश्वर चे अध्यक्ष भाई तुषार भैय्या गोळेगावकर यांनी दि18 केले .
ते शहरातील माधवराव पाटील महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या समाजशास्त्र विषयाच्या पदवी द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रम कार्यशाळेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते .यावेळी या कार्यशाळेचे उद्घाटन म्हणून समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ .शाहीनाथ घायाळ हे होते .तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.हरीश सातपुते,प्राचार्य डॉ.ए.टी शिंदे,डॉ.नारायण कांबळे,डॉ.अशोक मोटे, डॉ .रामचंद्र भिसे, डॉ . वेदप्रकाश मलवाडे ,यांची उपस्थिती होती .
यावेळी पुढे बोलताना गोळेगावकर म्हणाले की ,सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे .प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाला समांतर असला पाहिजे .समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमाने विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवासमृद्ध करताना त्यांना दैनंदिन जीवनात रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये ही महत्त्वाची भूमिका बजावली पाहिली .
यावेळी उद्घाटन करताना डॉ .घायाळ म्हणाले की,नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रमाणे निर्माण होणारा अभ्यासक्रम हा विद्यार्थी केंद्रित असेल त्यातून विद्यार्थ्यांचे भविष्य आणि जीवन उन्नत करण्याचा प्रयत्न अभ्यास मंडळ करेल .यावेळी डॉ .कांबळे आणि डॉ मोटेयांनीही आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले .यावेळी समाजशास्त्र अभ्यासक्रमाचे सर्व सदस्य उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ.नानासाहेब पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ .संजय बालाघाटे यांनी केले .तर आभार प्रदर्शन डॉ . कालिदास गुडदे यांनी मांडले .कार्यक्रमाला नांदेड परभणी हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात प्राध्यापकांची उपस्थितीहोती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.आत्माराम आरसुळे,डॉ सुखदेव चव्हाण,डॉ.भारत शिंदे , डॉ.उद्धव निर्वळयांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले .