परभणी (प्रतिनिधी) दुसरे विभागीय महसुल आयुक्तालय परभणी येथे तात्काळ कार्यान्वित करावे या मागणीचे निवेदन सावता सेना महाराष्ट्र राज्य जिल्हा परभणीच्या वतीने परभणीचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र राज्य.मुख्यमंत्री मा. ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आले.
सावता सेना महाराष्ट्र राज्य जिल्हा परभणीच्यावतीने निवेदनात म्हटले आहे की, परभणी जिल्हा मराठवाड्याचे हदय स्थान असून संतांची पावनभूमी आहे. निजामाच्या काळातील परभणी जिल्हा हा सर्वात जुना असून मराठवाड्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. पण आज हा जिल्हा विकासापासून कोसो दूर आहे. या जिल्ह्याला स्वातंत्र्यापासून काहीच मिळालेले नाही. परभणी करानी मोठा संघर्ष करून कृषी विद्यापीठ मिळवले.या ठिकाणी औद्यौगिक व ईलेक्ट्रानिक्स अभियांत्रिकी महाविद्यालय नाही, जिल्ह्यात एकही महाव्हॅली बरोबरच उद्योग धंदे नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परभणीला खंबीर राजकीय नेतृत्व नसल्यामुळे जिल्ह्यातील पूर्णा येथील लिको शेड नांदेड येथे. नेले आहे. नांदेड सोबतच लातूर व जालना जिल्ह्याने देखील या जिल्ह्यातील कार्यालये पळविली आहेत.परभणी वन विभागाचे वनरक्षक अधिकारी कार्यालय व परभणीचे आयकर कार्यालय हिंगोली येथे स्थलांतरित झाले आहे. पाटबंधारे कार्यालय जालना येथे स्थलांतरीत झाले आहे.दुसरे विभागीय महसूल आयुक्तालयासाठी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ, औरंगाबादच्या सन 1995-96 च्या वार्षिक ठरावात नवीन महसुल विभाग निर्माण करुन परभणी येथे मुख्यालय करणे असा ठरावात मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांचा अहवाल आहे. व तसेच नागपूर करार सुध्दा आहे. दुसरे विभागीय महसुल आयुक्तालय परभणीत होण्यासाठी यापुर्वी सन 2015 मध्ये आम्ही परभणी महसुल आयुक्तालय संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रचंड जनआंदोलन केले होते. तसेच हा प्रश्न जिल्ह्यातील सर्व आमदारांनी हिवाळी अधिवेशनात लावून धरला होता. आज सन 2015 पासून 2025 पर्यंत गेल्या 10 वर्षात शासनाने दूसरे विभागीय महसुल आयुक्तालय परभणीत होण्यासाठी कुठल्याही हालाचाली केल्या नाहीत. तसेच मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ औरंगाबादचा सन 1995-96 चा अहवालाचा मान ठेवून परभणीत दुसरे विभागीय महसुल आयुक्तालय तात्काळ कार्यान्वित करावे.सध्या परभणी जिल्ह्यात आपल्या पक्षाचे पालकमंत्र्यासह बहुसंख्येने आमदार आहेत. म्हणून परभणी जिल्ह्याच्या हक्काचे दुसरे विभागीय महसुल आयुक्तालय परभणीत तात्काळ कार्यान्वित करावे नसता सावता सेनेच्या वतीने यापुर्वीच्या आंदोलनापेक्षा प्रचंड तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. याची गांभिर्याने दखल घ्यावी अशी मागणी सावता सेना यांनी केली आहे. या निवेदनावर सावता सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे, विभागीय अध्यक्ष राम जाधव,मराठवाडा प्रवक्ता उध्दव समिंद्रे ,परभणी जिल्हाध्यक्ष शंकरराव काळे ,युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष डुब , महानगरअध्यक्ष संतोष ईखे,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड,युवक जि. उपाध्यक्ष राजू शिंदे, जिंतूर ता. अध्यक्ष लक्ष्मण शिदे,सेलु ता. अध्यक्ष कोंडिबा भोकरे , मानवत ता. अध्यक्ष प्रसाद घाटूळ, परभणी ता. अध्यक्ष बंडू राऊत, युवक ता. अध्यक्ष साई अंभोरे ,यु.जि. उपाध्यक्ष शाम नाईकनवरे,परभणी जि. संघटक सुरेश जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Saturday, August 22
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


