परभणी (प्रतिनिधी) सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती नविन पिढीला व्हावी या उद्देशाने माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व श्री विकास खारगे,मा. मुख्यमंत्री, यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मवर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानोपासक मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय परभणी या ठिकाणी करण्यात आले होते.
या कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित नाटिका,पोवाडे, नृत्य व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात नाट्यप्रवेश श्री प्रमोद शेलार व त्यांच्या संघांनी अतिशय सुंदर सादरीकरण केले.शाहीर दासराव पुंडगे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे गौरव पोवाडे सादर केले.रुपेश कदम यांच्या संघाने बहारदार अशी नृत्य सादर केली.श्रीराम भाऊ लांडे प्रमुख वक्ते यांनी आपल्या व्याख्यानातून पुण्यश्लोक अहिल्याबाई च्या कारकिर्दीचे माहिती दिली.या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्राची माहिती या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मांडण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य प्रो.डॉ.शेख बाबर यांनी तर प्रास्ताविक अन्सारी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.भास्कर गायकवाड यांनी तर आभार प्रो. डॉ.भीमराव खाडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी माननीय सुरेश भुमरे साहेब आणि शहरातील अनेक मान्यवरांसोबत महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. सर्व सहभागी कलाकारांचे श्री. विभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य, मुंबई यांनी केले अभिनंदन केले.