परभणी(प्रतिनिधी) :उमेदवारी अर्ज माघे घेण्याच्या अंतीम मुदतीत सोमवारी (दि.04) रोजी परभणी विधानसभा मतदारसंघातून 22 उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले असून त्यामुळे आता निवडणूकीच्या रिंगणात 15 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. परभणी विधानसभा मतदारसंघात या एकूण 46 उमेदवारांनी 59 नामनिर्देशन दाखल केले होते त्यात छाननी दरम्यान 37 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते.अर्ज माघारीच्या अंतीम मुदतीत म्हणजे सोमवारी 22 उमेदवारांनी माघार घेतली. अर्ज माघारीच्या अंतीम मुदतीत दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये किशनराव खरात (बहुजन समाज पार्टी), डॉ. संप्रिया राहुल पाटील (अपक्ष), विजय आंबादासराव वरपुडकर (अपक्ष), विनोद ज्ञानेश्वरराव रसाळ (अपक्ष), मिर्झा जाकेर बेग (अपक्ष), किशोर सखाराम रनेर (अपक्ष), शेख रफीक…
Author: Lok Sanchar
परभणी ( प्रतिनिधी) प्रेस छायाचित्रकार उत्तम बोरसुरीकर यांच्या मातोश्री सुंदरबाई नरसिंगराव बोरसुरीकर यांचे दि.2 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मृत्यु समयी यांचे वया 90 वर्षी होते.त्यांच्या वर आज दि 03 रोज रविवार सकाळी 11.00 वाजता जिंतूर रोड वैकुंठधाम स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात 4 मुलं बब्रुवान , प्रकाश, दिलीप आहेत. दैनिक लोकसंचार पारिवार बोरसुरीकर कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात सहभागी आहे.
परभणी (प्रतिनिधी) सध्या सर्वत्र दिवाळीची लगबग चालू असून अनेकांनी आपल्या घरावर विविध प्रकारच्या रोषणाई तसेच फुलांची सजावट केली आहे . कोणताही सण म्हटलं की महिला वर्गांची लगबग रांगोळी काढण्यासाठी असते यातच त्या रांगोळीच्या माध्यमातून विविध संदेशही दिले जातात. शहरातील लोकमान्य नगर येथील श्रीमती छाया उमाजी गायकवाड यांनी दीपावलीनिमित्त आज लक्ष्मीपूजनांच्या निमित्ताने रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती चा संदेश दिला. शहरातील लोकमान्य नगर येथील श्रीमती छाया उमाजी गायकवाड यांनी दीपावलीनिमित्त आज लक्ष्मीपूजनांच्या निमित्त प्रत्येक जणच आपल्या घरासमोर रांगोळी काढत असते परंतु श्रीमती गायकवाड यांनी सध्या सगळीकडेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान जनजागृती चे काम चालू आहे त्याच अनुषंगाने श्रीमती छाया गायकवाड आणि शुभांगी…
परभणी (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष यांनी प्रचाराला सुरुवात केली असून यात उबाटा तसेच महाविकास आघाडीचे डॉ. राहूल पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली असून या दरम्यान त्यांना अनेक संघटना व सामाजिक संस्थांचा पाठिंबा मिळत आहे यातच जिल्हा झेरॉक्स असोसिएशन, भीमशक्ती ऑटोरिक्षा संघटनेच्या वतीने परभणी निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे अनेक शिंदे गटाच्या कार्यकर्ते यांनी उबाटा गटात प्रवेश केला. जिल्ह्यातील भीमशक्ती ऑटोरिक्षा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल घनसावंत यांनी गुरुवारी पदाधिकाऱ्यांसह आ. डॉ.राहुल पाटील यांना संघटनेचे पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी नामदेव शिंदे, बाळासाहेब जोगदंड, फिरोज पठाण, राजू पाडोळे, चंद्रकांत पोंपलवार, राजू पवार, राज मोहम्मद शेख, दत्ता गिरी, सतीश खरात,…
परभणी, (प्रतिनिधी) माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, संतोषी देवकूळे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह उपस्थित अधिकारी –कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेतली. *-*-*-*
परभणी (प्रतिनिधी) येथील शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दीपावली निमित्त अनाथाश्रमात राहणाऱ्या अनाथ मुलांना मिठाई व फराळाचे वाटप महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांच्या हस्ते करण्यात आले. शांतिदुतच्या जनता मार्केट रोड वर असलेल्या कार्यलयात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य बाळासाहेब जाधव, डॉ. दिनेश भुतडा, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, सौ .वर्षा सारडा,रफिक भाई हे उपस्थित होते. मागील 30 वर्षापासून दरवर्षी दिपावलीनिमित्त मिठाई व फराळ वाटपाचा कार्यक्रम शांतिदुतच्या वतीने राबविण्यात येतो . त्या नुसार परभणी शहरातील विविध अनाथ आश्रमात राहणाऱ्या मुलांना मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना महिला व बालविकास…
जिंतूर ( प्रतिनिधी)जिंतूर विधानसभा मतदारसंघाकरीता 41 उमेदवारांनी 50 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. अनिल बन्सी चव्हाण (बहुजन समाज पार्टी), बोर्डीकर मेघना दिपक साकोरे (भाजप), भांबळे विजय माणिकराव (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), कृष्णा त्रिंबकराव पवार (ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी), दिनकर धारोजी गायकवाड (राईट टू रिकॉल पार्टी), नागरे सुरेश कुंडलीकराव (वंचित बहुजन आघाडी), डॉ. प्रभाकर बुधवंत (राष्ट्रीय समाज पक्ष), रमेश भिमराव राठोड (जय सेवालाल बहुजन विकास पार्टी), शेख सलीम शेख इब्राहीम (ऑल इंडिया मजलीस ए इन्कलाब ए मिलत), सुभाष किसन वाव्हळे (बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी), अच्युत लिंबाजी कदम (अपक्ष),…
परभणी ( प्रतिनिधी) परभणी विधानसभा मतदारसंघाकरीता 46 उमेदवारांनी 59 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 37 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. अशोक किशनराव खरात (बहुजन समाज पार्टी), आनंद शेषराव भरोसे (शिवसेना), डॉ. राहूल वेदप्रकाश पाटील (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे), श्रीनिवास सुरेशचंद्र लाहोटी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), ॲड. इम्तीयाज खान आजम खान (ऑल इंडिया मजलीस ए इतेहादूल मुस्लिमिन), डॉ. गोवर्धन भिवाजी खंडागळे (बहुजन भारत पार्टी), चकोर महामुनी सावित्री (राष्ट्रीय समाज पक्ष), विजय आदिनाथराव वरवंटे (बुलंद भारत पार्टी), शेख सलीम शेख इब्राहिम (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्किलाब-ए-मिल्लत), अतिश बापूराव गरड (अपक्ष), अनिता रवींद्र सोनकांबळे (अपक्ष), ॲड. अफजल बेग साहाब (अपक्ष), अली…
परभणी,(प्रतिनिधी) : एनव्हीएस मराठवाडा हायस्कूलचे राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)चे ऑफिसर शिरीष जयपूरकर यांचा जवाहन नवोदय विद्यालयात एनसीसीने आयोजित केलेल्या एटीसी कॅम्पमध्ये नियम वयोमानानूसार एनसीसीतून सेवानिवृत्तीबद्दल 52 महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेडचे कमांडिंग ऑफिसर तथा कर्नल रंगाराव यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र प्रदान करुन यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी एओ तथा कर्नल दिलीप रेड्डी, मेजर प्रशांत सराफ, लेफ्टनंट जयकुमार देशमुख, फर्स्ट ऑफिसर सावळे, सेंकड ऑफिसर रंगनाथ राठोड, थर्ड ऑफिसर सौ. नवशिंदे हे उपस्थित होते. या मान्यवरांनी आपल्या भाषणातून जयपूरकर यांनी एनसीसीत दिलेल्या अमूल्य योगदानाचे मुक्तकंठाने कौतूक केले. त्याचबरोबर एनसीसीचे सुभेदार मेजरसह सर्व परडे इन्स्ट्रक्टर व कार्यालयीन कर्मचारी तसेच कॅम्प्मधील 500 कॅडेट…
परभणी (प्रतिनिधी) शहर महानगरपालिके मार्फत धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्र येथे 80 लक्ष लिटर क्षमतेचे बैठा जलकुंभ (संप) बांधण्यात आलेला आहे. सदर बैठा जलकुंभ हा अमृत योजने अंतर्गत बांधण्यात आला आहे. परभणी शहराला येलदरी धरणातून पाणीपुरवठा होत असून येलदरी धरणातून येणारे पाणी धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्र येथे शुद्धीकरण करण्यात येत आहे. येलदरी धरणाची उंची धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्र पेक्षा 86 मीटर जास्त असल्याने पाण्याचे फ्लो (प्रवाह) मोठा असतो यामुळे जलशुद्धीकरण केंद्र धर्मापुरी येथील विदयुत पुरवठा खंडीत झाल्यास तो पुन्हा सुरळीत होईपर्यंत पाणी वाया जात आहे. सदर वाया जाणा-या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व त्यावर योग्य उपाय व पाण्याची बचत करण्यासाठी परभणी महानगरपालिकेने धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्र…

