परभणी (प्रतिनिधी) सध्या सर्वत्र दिवाळीची लगबग चालू असून अनेकांनी आपल्या घरावर विविध प्रकारच्या रोषणाई तसेच फुलांची सजावट केली आहे . कोणताही सण म्हटलं की महिला वर्गांची लगबग रांगोळी काढण्यासाठी असते यातच त्या रांगोळीच्या माध्यमातून विविध संदेशही दिले जातात. शहरातील लोकमान्य नगर येथील श्रीमती छाया उमाजी गायकवाड यांनी दीपावलीनिमित्त आज लक्ष्मीपूजनांच्या निमित्ताने रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती चा संदेश दिला.
शहरातील लोकमान्य नगर येथील श्रीमती छाया उमाजी गायकवाड यांनी दीपावलीनिमित्त आज लक्ष्मीपूजनांच्या निमित्त प्रत्येक जणच आपल्या घरासमोर रांगोळी काढत असते परंतु श्रीमती गायकवाड यांनी सध्या सगळीकडेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान जनजागृती चे काम चालू आहे त्याच अनुषंगाने श्रीमती छाया गायकवाड आणि शुभांगी गायकवाड यांनी आपल्या घरासमोर साकारलेल्या रांगोळी मधून मतदानाचा करण्याचा संदेश यामधून त्यांनी दिला आहे
(छाया-उत्तम बोरसुरीकर)


