परभणी,(प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, 2024 चा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असुन जिल्ह्यातील चारही मतदार संघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या ई-पीक म्हणजेच मतदार फोटो ओळखपत्र आणि इतर 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा मतदारांना मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना दाखविल्यानंतर मतदारांना मतदार करता येणार आहे. आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजने अंतर्गत जारी केलेले विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेव्दारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम पब्लिक लिमिटेड…
Author: Lok Sanchar
परभणी, (प्रतिनिधी) निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती के. हरिता यांनी आज परभणी शहरांतील विविध मतदानकेंद्रांना भेट देऊन मतदान केंद्र आणि परिसराची पाहणी केली. यावेळी निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी सचिन कवठे, नायब तहसीलदार अनिता वडवळकर, मंडळ अधिकारी मिलिंद विटेकर, तलाठी रविकांत काळे यांच्यासह नवा मोंढा पोलीस स्टेशन, नानलपेठ पोलीस स्टेशन, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देत मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध कराव्यात. विशेषत: दिव्यांग, जेष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना श्रीमती के. हरिता यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी मतदान केंद्र परिसराची देखील…
पालम (प्रतिनिधी) दिनांक 6 रोजी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समिती पालम येथे गणेशराव रोकडे दादा (संचालक जि. म.सह बँक परभणी) यांच्या अध्यक्षते खाली पालम तालुक्यातील सर्व चेअरमन संघटनेची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये सर्वानुमते चेअरमन संघटना पालम तालुका अध्यक्षपदी मोतीराम रावसाहेव खंडागळे यांची तर ओंकार साहेबराव ठाकूर (सावंगीथंडी) आणि भागवत दत्तराव कऱ्हाळे (खरब धानोरा)यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच सचिवपदी शामराव दत्तराव काळे (गुंज)तर सहसचिवपदी कैलास बालासाहेब भागवत आणि कोषाध्यक्षपदी शिवाजीराव माधवराव उगिले (उमरा) यांची निवड करण्यात आली. या सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व कार्यकारणी आणि सदस्य यांचा सत्कार मा. आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित सदस्य…
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024; परभणी, (प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार दि. 8 नोव्हेंबर, 2024 रोजी दुपारी 12 वाजता मतदान यंत्राची (ईव्हीएम-व्हीव्हीपॅट) द्वितीय सरमिसळ (Second Randomization) जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या ठिकाणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांच्या, तसेच मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्य पक्षाचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांच्या समक्ष होणार आहे. या द्वितीय सरमिसळ (Second Randomization) साठी उपस्थित राहण्याबाबत सर्व उमेदवारांना कळविण्यात आलेले असून ईव्हीएम-व्हीव्हीपॅट विषयक सर्व प्रक्रिया समजून घेण्यासाठी त्याचप्रमाणे द्वितीय सरमिसळ (Second Randomization) प्रत्यक्ष पाहण्यासाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील सर्व निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ…
परभणी, (प्रतिनिधी) जिल्हयात विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन तसेच संबधित नोडल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी देखील प्रयत्न करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली. परभणी जिल्हयातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक तयारीचा आढावा विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथुर, उपायुक्त अनंत गव्हाणे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर…
परभणी(प्रतिनिधी) आज मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024 रोजी परभणी तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात 96-परभणी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने मतदारसंघातील निवडणूक लढविणाऱ्या 15 उमेदवारांच्या खर्च नियमनासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीसाठी दुपारी 3 वाजता उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठक मा. निवडणूक खर्च निरीक्षक राहुल मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महत्त्वाचे म्हणजे, या निवडणुकीत उमेदवारांच्या खर्च मर्यादेत 12 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ही मर्यादा 28 लाख होती, जी आता वाढवून 40 लाख रुपये करण्यात आली आहे. यावेळी परभणीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ…
परभणी (प्रतिनिधी) ग्रामीण भागात गाई म्हशींसाठी कृत्रिम रेतनाची सुविधा देणाऱ्या तज्ञांची उणीव भासत असल्याकारणाने अशा प्रकारच्या सेवा देणाऱ्या तज्ञांचा अनुशेष दूर करण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ,नागपूर आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात बहुउद्देशीय कृत्रिम रेतन तंत्रज्ञ मल्टीपर्पज आर्टिफिशियल इन्सिमिनेशन टेक्निशियन अर्थात मैत्री संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी येथे तीन महिन्याच्या मैत्री प्रशिक्षणाचे समारोह आज दिनांक 6.11. 2024 रोजी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.अनिल भिकाने यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.सुधीर राजुरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. प्रशिक्षणासाठी 60…
परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निमित्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी परभणी व नोडल अधिकारी प्रा. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती व्हावी व मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा ऑनलाइन होणार असून शालेय गट इयत्ता 8 ते 10वी व महाविद्यालयीन गट इयत्ता 12 ते पदवी स्तर या गटात होणार असून विजेत्यांना परितोषिके देणार आहेत. तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहेत. वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटासाठी ‘मतदाराचे अधिकार आणि कर्तव्ये’, ‘मतदार राजा जागा हो…’, ‘आई बाबा! तुम्ही मतदान कराच..’ हे तीन विषय असणार आहेत. तर महाविद्यालयीन गटासाठी ‘जागृत नागरिक…
*पूर्वतयारी आढावा बैठकीत आयोगाचे निर्देश* छत्रपती संभाजीनगर:- निवडणूक प्रक्रिया राबवितांना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांनी आज निवडणूक यंत्रणांना दिले. येथील स्मार्ट सिटी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीस राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, अति.मुख्य निवडणूक अधिकारी बी. प्रदीपकुमार, उपसचिव सुमनकुमार, संजयकुमार, अभिलाष कुमार, अनिलकुमार, अविनाशकुमार तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास…
परभणी (प्रतिनिधी) मूळ परभणीचे रहिवाशी असलेले प्रसिद्ध गायक तथा संगीतकार विक्रम अशोक परळीकर यांचे मंगळवार दि 5 राजी रात्री 9.00 वाजता मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, मृत्यूसमयी ते 55 वर्षांचे होते सुरवातीचे शिक्षण सुरमणी डॉ.कमलाकर परळीकर यांच्याकडे, नंतर मुंबईत पंडित अजित कडकडे यांच्याकडे झाले. नवी मुंबईत खारघर भागात ते स्वामी समर्थ संगीत विद्यालयाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात कार्यरत होते. अनेक दिग्गज गायकांसोबत परळीकर यांनी साथ संगत केली तर अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमात सादरीकरण केले. कवी शाम यांनी लिहिलेल्या रचनांच्या ध्वनिफीत त्यांनी तयार केल्या असुन सलग दोन वेळेस तेरा तास दीर्घ गायनाचा त्यांचा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये समावेश करण्यात आलेला…

