Author: Lok Sanchar

परिक्षा केंद्र परिसरात कलम 163 लागू परभणी (प्रतिनिधी) राज्य राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 परभणी मुख्यालयातील 12 उपकेंद्रावर रविवार दि. 1 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 10 ते 12 (पहिला पेपर) आणि दुपारी 3 ते 5 (दुसरा पेपर) दोन सत्रात होणार आहे. जिल्ह्यातील 3 हजार 24 उमेदवारांची बैठक व्यवस्था 1) ज्ञानोपासक महाविद्यालय, जिंतूर रोड, परभणी 2) कै. रावसाहेब जामकर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, जिंतूर रोड, परभणी 3) शारदा महाविद्यालय, सुभाष रोड, परभणी 4) बालविद्या मंदिर विद्यालय, नानलपेठ, शिवाजी पार्क, परभणी 5) श्री शिवाजी महाविद्यालय (ग्राऊंड फ्लोअर), वसमत रोड, परभणी 6) एन.व्ही.एस.मराठवाडा हायस्कूल, शिवाजी नगर, वसमत रोड, परभणी 7) गांधी…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेक्स्ट जेन डिजिटल कृषीसाठी अभियांत्रिकी नवकल्पना’ या विषयावर इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनिअर्सचे 58 वे वार्षिक अधिवेशन आणि कृषी परिवर्तनाकरिता इच्छुक युवकांसाठी ‘कृषी अभियांत्रिकी शिक्षण’ या विषयावर 12 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय परिसंवादाचा उद्घाटन समारंभ दीक्षांत सभागृहात होणार असून याप्रसंगी भास्तीय कृषि संशोधन परिषदेचे माजी महासंचालक पद्मभुषण डॉ.आर.एस.परोडा, महासंचालक डॉ. हिमांशु पाठक, आयआयडी कानपुरचे संचालक पद्मश्री डॉ. मनींंद्र अग्रवाल, आयआयटी खरगपुरचे संचालक डॉ. व्ही. के. तिवारी, कृषि परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, पीडीकेव्ही अकोलाचे…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) – 96-परभणी विधानसभा मतदारसंघातील 2024 विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी होणार असल्याने मतदारसंघात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांच्या कमिशनिंग व सिलिंग प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या प्रक्रियेत झोनल अधिकारी, मास्टर ट्रेनर आणि संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांची जबाबदारी समजावून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डीपीडीसी हॉलमध्ये आयोजित या बैठकीत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. संदीप राजपुरे, तहसिलदार आम्रपाली कासोदेकर, उमाजी बोथीकर, नायब तहसिलदार अनिता वडवळकर, गणेश चव्हाण, विष्णू पकवाने, मधुकर क्षीरसागर, सतीश रेड्डी, अनिकेत पालेपवाड,…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : मानवत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका मुलीच्या विनयभंग प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी शिवाजी कारभारी शिंदे यास पोक्सो कायदा कलम 8 अन्वये तीन वर्षे कैद, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा तर भादंवि कलम 506 अंतर्गत सहा महिने कैद, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. मानवत पोलिस ठाण्यात 30 मे 2023 रोजी एक तक्रार दाखल झाली होती. त्यातून तक्रारकर्त्याने मुलगी व मुलगा एका किराणा दुकानावरुन सामान घेवून घरी परतत असतांना आरोपी शिवाजी कारभारी शिंदे याने तुच्या मापाचे कपडे आले आहेत, मला तुझे…

Read More

परभणी (प्रतिनिधी) शहरातील कलावंताच्या प्रमुख मागणी, समस्या या आजपर्यंत शासन दरबारी आ. डॉ. राहूल पाटील यांनी मांडल्या आहेत. यात नवीन नाट्यगृह निर्मीतीमध्ये त्यांनी विशेष प्रयत्न केले. वेळोवेळी निधीसाठी पाठपुरावा केला. आगामी काळात या नाट्यगृहासाठी निधी आणण्यास प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन या प्रसंगी डॉ.विवेक नावंदर यांनी उपस्थितांना दिले. शहरातील स्थानिक कलावंताची बैठक वैष्णवी मंगल कार्यालयात रविवार (दि.11)रोजी पार पडली. या बैठकीस विजय करभाजन, किशोर पुराणिक, पांचाळ, सूकते, संजय पांडे, कुलकर्णी, उपेंद्र दुधगावकर, संकेत पांडे, चांदजकर यांच्यासह शहरातील कलावंत उपस्थित होते. स्थानिक कलावंतांनी परभणी शहराचे नाव जगभरात आपल्या कलेच्या माध्यमातून पोहचविले आहे. त्यांना विविध बाबींची सुविधा परभणी शहरात उपलब्ध करुन देण्यासाठी…

Read More

परभणी, (प्रतिनिधी)– विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणुकीशी संबंधित विविध कक्षांना भेट देऊन कामाकाजाची पाहणी केली. श्री. गावडे यांनी निवडणूक साहित्य कक्षाची पाहणी करताना साहित्य वाटपाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले. सर्व साहित्य वेळेत संबंधित स्थळी पोहोचविण्याची दक्षता घेण्यास सांगितले. टपाल मतपत्रिका, आचारसंहिता कक्षाचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यम कक्षाला जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. कक्षामध्ये सुरु असलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे कामकाज, मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमांच्या कामाकाजाचा त्यांनी आढावा घेतला व मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, संतोषी देवकुळे, जिल्हा माहिती…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : परभणी विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या पार्श्‍वभूमीवर रविवारी (दि.10) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) आणि व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी पर्ची यंत्र) मशीनच्या पेअरिंगची प्रक्रिया पार पडली. त्यानिमित्त सकाळी 11.20 वाजता स्ट्राँग रूमचे सील उमेदवारांच्या उपस्थितीत उघडण्यात आले. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी परभणी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. संदीप राजपुरे, नायब तहसिलदार अनिकेत पालेपवाड, मास्टर ट्रेनर सुभाष काचगुंडे आणि परभणी महानगरपालिका सहआयुक्त प्रज्ञावंत कांबळे हे उपस्थित होते. मतदारसंघात लढणार्‍या उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींनी देखील या प्रक्रियेची साक्ष दिली. ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन पेअरिंगची…

Read More

परभणी (प्रतिनिधी) महाराष्ट्र शिक्षक पात्र परीक्षा 2024 चे आयोजन आज रविवारी दिनांक 10 रोजी दोन सत्रात आयोजित करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात 9 केंद्रावर पेपर-1 तर दुपारच्या सत्रात 12 केंद्रावर पेपर- 2 ची परीक्षा घेण्यात आली. यावेळी परीक्षा केंद्रावर उपस्थित विद्यार्थ्यांची उपस्थिती ओळख ही बायोमेट्रिक फेस रिकग्निशन याद्वारे घेण्यात आली. पेपर 1 साठी सकाळी 9 वाजता तर पेपर 2 साठी दुपारी 2 वाजता परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांचे मोबाईल इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल आधी जमा करण्यात आली सकाळच्या सत्रात 9 केंद्रांवर एकूण 3326 पैकी 3119 परीक्षार्थीनी परीक्षा दिली त्यावेळेस 207 परीक्षार्थी अनुपस्थितीत होते. तर दुपारच्या सत्रात…

Read More

पालम (प्रतिनिधी) दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला गोपाष्टमीचा सण साजरा केला जातो. यावेळी ही तिथी ९ नोव्हेंबर, शनिवारी संपन्न झाली. या दिवशी गायींसह वासरांची पूजा केली जाते.जरी हा सण संपूर्ण देशात साजरा केला जातो, परंतु मथुरा, वृंदावनमध्ये त्याची रौनक पाहण्यासारखी असते या दिनी सवत्स गोपूजन करण्यात येते श्री सद्गुरु बाळकृष्ण गोशाळा पालम येथे सायंकाळी गोसेवकांच्या वतीने गोपुजन करण्यात आले. यावेळी श्री सद्गुरु बाळकृष्ण गोशाळा पालम चे सचिव गोसेवक अविनाश देविदासराव जोशी पालमकर यांच्या वतीने मंत्रोच्चार युक्त संकल्प करून सवत्स गौपूजन करण्यात आले यावेळी सर्वप्रथम गोमाता संकल्प, गोमाता पूजन करून गोमातेस गोग्रास अर्पण करण्यात आला व गोआरती करण्यात आली…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या (गट-क) अध्यक्षपदी संतोष किशनराव निंबरे तर प्रमुख कार्यवाहपदी अमृत विक्रम कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. वसमत रस्त्यावरील भाग्य नगरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात रविवारी (दि.10) सकाळी 11 वाजता परभणी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. महासंघाचे उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष प्रमोद कदम हे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीतून 2024 ते 2029 या कालावधीसाठी नवीन कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी निंबरे, उपाध्यक्षपदी सतीश विठ्ठलराव देशमुख (हिंगोली जिल्हा), सचिन गंगाराम भालेराव, सचिन बालासाहेब घुले, प्रमुख कार्यवाह म्हणून अमृत विक्रम कदम, सहकार्यवाह दीपक सोपानराव पंढरकर, कोषाध्यक्ष राजेश गणपतराव काळे, सहकोषाध्यक्ष…

Read More