पालम( प्रतिनिधी ) : पालम तालुक्यातील 66 ग्रामपंचायतीचे येत्या पंचवार्षिकतेसाठी सरपंच उपसरपंच पदाचे आरक्षण तहसीलदार कैलास चंद्र वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आज तहसील कार्यालयातील सभागृहामध्ये तालुक्यातील सर्व गावातील सरपंच उपसरपंच व सदस्य त्याचबरोबर इतर नागरिक यांचे उपस्थितीत सोडण्यात आले
ते पुढील प्रमाणे अनुसूचित जाती महिलेसाठी पाच, अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी चार, अनुसूचित जमाती महिला एक, अनुसूचित जमाती सर्वसाधारण दोन, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलां साठी नऊ, नागरिकाचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण साठी नऊ, सर्वसाधारण महिलेसाठी आठरा, सर्वसाधारण साठी आठरा अशाप्रकारे तालुक्यातील 66 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण आज रोजी शासनाचे नियमानुसार योग्य ती प्रक्रिया पार पाडून जाहीर करण्यात आले त्यावेळी नायब तहसीलदार राजेश्वर पवळे, नायब तहसीलदार श्री पवार, गटविकास अधिकारी उदयसिंह शिसोदे, यांचे सह आदी प्रत्येक गावातील सरपंच उपसरपंच व सदस्य पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते