पालम (प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.सुनीलजी जाधव यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला “विद्यार्थी गुणगौरव सोहळा” बळीराजा विद्यालय, मरडसगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. अशोकजी कोरडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणप्रेमी मा. पांडुरंग काळे सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मा. मोरताटे सर यांच्या रसाळ सूत्रसंचालनाने झाली. प्रस्तावना श्री मांजरमे सर यांनी केली. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा व अन्य शालेय उपक्रमांमध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा शाळेच्या व संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यामध्ये अविनाश गजानन जाहिर ,
व्यंकटेश बालासाहेब वाकडे ,प्रविण माणिक वाकडे,व्यंकटेश बालासाहेब वाकडे डाॅ.होमी भाभा परीक्षेत व एन एम एम एस परीक्षेत यश मिळवून शिष्यवृत्तीधारक झाल्याबद्दल त्यांचा मानसन्मान करण्यात आला. संस्था अध्यक्ष मा. सुनीलजी जाधव यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेला आधुनिक साधनसंपत्ती उपलब्ध करून देण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला. “गावच्या प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण आणि संधी मिळायला हवी. आपल्या शाळेतूनही डॉक्टर, अभियंते, अधिकारी तसेच कलाकार तयार होतील यासाठी संस्थेच्या पातळीवर प्रयत्न सुरू राहतील,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या भाषणाने पालक व शिक्षकांमध्ये आशावाद निर्माण झाला.
प्रमुख पाहुणे पांडुरंग काळे सर यांनी “गावकऱ्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी पुढे यावे, ही शाळा फक्त शिक्षणसंस्था नसून गावाचा आत्मा आहे,” असे म्हणत गावकऱ्यांच्या वतीने शाळेला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मुख्याध्यापक अशोकजी कोरडे यांनी आपल्या समारोपात, “संस्थेचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन हे आमच्यासाठी प्रेरणादायी ठरते. अशा कार्यक्रमामुळे शिक्षक म्हणून काम करण्यास अधिक ऊर्जा मिळते,” असे उद्गार काढले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बापूराव मांजरने,दीपक वाकडे,गोविंद बडवणे, आनंदा जाधव, संगीता लोमटे, कोमलवार सर, गोविंद शिंदे सर, स्वप्नाली शिंदे मॅडम, लक्ष्मण निळे यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे कलाध्यापक श्री गोपी मुंडे यांनी केले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल आणि शिक्षकांना त्यांच्या कार्याचा नवा आत्मविश्वास लाभेल, असा विश्वास पालकांनी व मान्यवरांनी व्यक्त केला.