परभणी,(प्रतिनिधी) : जम्मू काश्मिर येथील पहलगाम या पर्यटनस्थळी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ येथील शिवसेनेच्या (शिंदे गट) नेतेमंडळींनी बुधवारी (दि.23) परभणीत जोरदार निदर्शने केली.
जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, संपर्कप्रमुख माजी खासदार अॅड. सुरेश जाधव, सहसंपर्क प्रमुख भास्कर लंगोटे पाटील, मागासवर्गीय सेलचे जिल्हा प्रमुख धम्मदीप रोडे, मागासवर्गीय जिल्हा सेलचे माजी जिल्हा प्रमुख माणिकराव कदम, महानगरप्रमुख नितेश देशमुख, तालुका प्रमुख प्रभाकरराव कदम, विधानसभा संघटक अशोकराव पाटील यांच्यासह अन्य नेतेमंडळींनी जिल्हा प्रशासनास एक निवेदन सादर करीत या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत, असे नमूद केले. या अतिरेकी कारवायांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याकरीता सरकारने कठोर पाऊले उचलावीत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


