परभणी(प्रतिनिधी)जम्मू – काश्मीर येथील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवार (दि० २४)रोजी परभणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
सकल हिंदू समाजाच्यावतीने काल बुधवार रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेध म्हणून परभणी जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार या आवाहनाला प्तिसाद देत परभणी शहरातील संपूर्ण बाजारपेठ, दुकाने, प्रतिष्ठाने आणि अंतर्गत वाहतुकीची सेवा कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. तर परभणी बंद मोर्चाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेंडॉल उभारण्यात आला आहे. या पेंडॉल परिसरात अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची उपस्थिती आहे
दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षास्थळे निश्चित करण्यात आले आहेत. तसेच जागो – जागी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. परभणी बंदच्या पार्श्वभूमीवर बंद शांततेत पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (छाया उत्तम बोरसुरीकर)