Author: Lok Sanchar

परभणी,(प्रतिनिधी) : परभणी म्हणजे माझे होम पिच आहे, इथं येणं एक मजा आहे. तुम्ही आहातच तसे, असे नमूद करतेवेळी गद्दारी झाली परंतु, आ. पाटील असो, खा. जाधव व परभणी जिल्हावासीयांनी गद्दारीचा तो किडा गडाला लागू दिला नाही. लोकसभेतून प्रचंड मताधिक्याने विजय दिला आता विधानसभा निवडणूकीतसुध्दा तेवढ्याच मताधिक्याने चारही उमेदवार निवडणून द्या, असे आवाहन शिवसेनेचे (उबाठा) पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. परभणी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना (उबाठा) तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ शहरातील जिंतूर रोड वरील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर शनिवारी (दि.09) रात्री आयोजित केलेल्या जाहीर सभेप्रसंगी पक्षप्रमुख ठाकरे बोलत होते. यावेळी…

Read More

परभणी (प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व भारतीय खेल प्राधिकरण यांच्याकडून परभणी येथे चालणाऱ्या खेलो इंडिया टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंना गणवेशाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून परभणीचे टेबल टेनिस खेळाडू चेतन सुरवसे हे उपस्थित होते त्याचबरोबर बी रघुनाथ महाविद्यालयाचे उपप्राचार्य माधव पाटील आणि भारत सव सवंडकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमात टेबल टेनिस खेळाडूंना ट्रॅक सूट टी-शर्ट शॉट्स आणि शूज यांचे वाटप जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या हस्ते करण्यात आले. हे वाटप खेळाडूंच्या स्पर्धेतील सहभाग स्पर्धेतील निकाल दररोजच्या सरावातील उपस्थिती या आधारावर देण्यात आले. या खेळाडूंमध्ये…

Read More

दुसरे प्रशिक्षण पूर्ण ;  कर्मचाऱ्यांची तयारी अंतिम टप्प्यात परभणी (प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांचे दोन सत्रामध्ये प्रशिक्षण येथील कृषी विद्यापीठात संपन्न झाली या प्रशिक्षणात 46 प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणासाठी दांडी मारली अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होणार आहे या प्रशिक्षणा दरम्यान जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे , श्रीमती के हरिता , निवडणूक निरीक्षक यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. संदीप राजपुरे ,नायब तहसीलदार अनिकेत पालेपवाड,गणेश चव्हाण,अनिता वडवळकर,जिल्हा स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे,उमाजी बोथीकर, आम्रपाली कासोदकर, एम. ए. क्षीरसागर, विष्णू पकवाने, दिपक नागरगोजे आदींची उपस्थिती होती.मुख्य सभागृहाच्या समोर…

Read More

पालम (प्रतिनिधी)नांदेड जिल्ह्यातील गुरु बुद्धी मठ संस्थान गडगा येथील हरेश्वर सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शन खाली गळगा येथून मन्मथ स्वामी ला जाणाऱ्या पद यात्रेचे पालम मध्ये स्वागत करण्यात आले यावेळेस पालम तालुक्यातील वीरशैव लिंगायत समाजातील समाज बांधव उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओमकार चिंचोले, वैजनाथ गव्हाणे, अशोक स्वामी, कपिल दावलबाजे, सूर्यकांत खिचडे, सुधाकर नागठाणे, संजय स्वामी, संभाजी नागठाणे, सूर्यकांत पळसकर, आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले…

Read More

परभणी (प्रतिनिधी) परभणी विधानसभेचे महाविकास आघाडी तथा शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार आ. डॉ. राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभे पाठोपाठ रविवारी (दि.10) दुपारी 2 वा. गंगाखेड रोडच्या माहेर मंगल कार्यालयात भीमशक्तीचे अध्यक्ष तथा खा. चंद्रकांत हांडोरे यांची जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेस हजारोंच्या संख्येने मतदार बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. परभणी विधानसभेचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार आ. डॉ. राहुल पाटील यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने नुकतीच भीमशक्तीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. महाविकास आघाडीतर्फे परभणीत भीमशक्तीचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हांडोरे यांची सभा रविवारी दुपारी 2 वाजता गंगाखेड रोड भागात माहेर मंगल कार्यालयामध्ये आयोजित…

Read More

परभणी/प्रतिनिधी शिवसेनेचा प्राण असलेला धनुष्यबाण काही लोकांनी काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवून आणण्याचे काम आम्ही केले. त्याची शान वाढविण्याचे काम आता करायचे आहे. परभणीच्या स्थानिक आमदाराने जनतेचा भ्रमनिरास केला असून काहीही काम करायचे नाही, दमडीचे काम करायचे आणि त्याचे श्रेय लाटण्यासाठीच पुढे यायचे असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे परभणीला विकासाच्या वाटेवर नेऊन विकासाची पर्वणी साधा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीच्या जनतेला केले. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महायुतीचे परभणी मतदारसंघातील उमेदवार आनंद भरोसे, जिंतूर मतदारसंघाच्या उमेदवार आ.मेघना बोर्डीकर यांच्यासह विजय वरपूडकर, माजी आ.हरिभाऊ…

Read More

रॅलीत नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन परभणी, (प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या सायकल रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे. सायकल रॅलीची सुरुवात सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पासून ते पुढे बसस्टँड-उड्डान पुल-ज्ञानोपासक महाविद्यालय-रायगड कॉर्नर-सिव्हील हॉस्पिटल-शिवाजी चौक-नारायण चाळ-स्टेडियम-छ. शिवाजी पुतळा-वसमत रोड-राजगोपालचारी उद्यान या मार्गाने सावली विश्राम गृह येथे समारोप करण्यात येणार आहे. सदरील सायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी आपली नावे रणजित काकडे (मो.क्र.9423444467), गणराज येरमळ (मो.क्र.8975950690), महेश देशमुख (मो.क्र. 8459973908), प्रवीण वायकोस (मो.क्र.9552239003)…

Read More

परभणी, (प्रतिनिधी)  : परभणी विधानसभा मतदारसंघातंर्गत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना आज व्दितीय प्रशिक्षण देण्यात आले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात पार पडलेल्या या प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती के. हरिता, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आदी उपस्थित होते. यावेळी श्रीमती हरिता यांनी प्रशिक्षणाच्या संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. तसेच निवडणूक कर्तव्यार्थ असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पोस्टल मतदान प्रक्रियेची देखील पाहणी केली. प्रशिक्षण सत्रात जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. परभणी विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांच्यासाठी आवश्यक असणारे वाचन साहित्य क्यूआर कोडच्या…

Read More

परभणी (प्रतिनिधी) महायुतीचे तसेच शिवसेना पक्षाचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा 9 नोव्हेंबर रोजी सावली विश्रामगृह समोर येथे 11 वाजून 45 मिनिटांनी आयोजित करण्यात आली आहे . परभणी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ 9 नोव्हेंबर शनिवार रोजी सावली विश्रामगृह वसमत रोड समोरील मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी पोलीस मुख्यालय येथील परेड मैदानावर हेलीपॅड येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी ते सभा स्थळाकडे रवाना होतील. त्यानंतर 12 वाजून 30 मिनिटांनी ते पुन्हा हेलिकॉप्टर द्वारे नांदेड…

Read More

परभणी (प्रतिनिधी)परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार आ. डॉ.राहुल पाटील, गंगाखेडचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या (9 नोव्हेंबर) शनिवार सायंकाळी 7वाजता येथील महात्मा फुले विद्यालय जिंतूर रोड परभणी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेच्या तयारीच्या अनुषंगाने एक बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस खा. संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खा. संजय जाधव म्हणाले, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणीत शनिवारी प्रचारासाठी सभेनिमित्त येणार आहेत. मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांनी हजारोंच्या…

Read More