पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील पेठ शिवणी येथील भारतरत्न डॉ बाळासाहेब आंबेडकर १३४ वी सार्वजनिक जयंती उत्सव आयोजनासाठी बुद्ध विहार पेठ शिवणी येथे बैठकीचे आयोजन करण्यात येऊन सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार विलास वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून तर उपाध्यक्षपदी किशोर वाघमारे , सचिव पदी पत्रकार अंकुश वाघमारे, सहसचिव पदी दिनाजी भालेराव, कोषाध्यक्षपदी सिद्धार्थ जोंधळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून प्रति वर्षाप्रमाणे काही वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सार्वजनिक जयंती साजरी करण्यात येणार असून दि २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न होईल तसेच ४:००वाजता पेठ शिवणी गावातील मुख्य रस्त्यावरून महापुरुषाच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात निघून सायंकाळी ९:०० वाजता बुद्ध वंदनेने विसर्जन होईल. व रात्री भीम गीतांचा जंगी सामना रंगणार असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका काजल सातोरे व देवानंद जगताप यांचा भीम गीतावर जंगी सामना होणार आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


