परभणी ( प्रतिनिधी) परभणी तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात 96-परभणी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने मतदारसंघातील निवडणूक लढविणाऱ्या 15 उमेदवारांच्या खर्च नियमनासाठी मंगळवार, 5 नोव्हेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीसाठी दुपारी 3 वाजता उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठक निवडणूक खर्च निरीक्षक राहूल मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महत्त्वाचे म्हणजे, या निवडणुकीत उमेदवारांच्या खर्च मर्यादेत 12 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ही मर्यादा 28 लाख होती, जी आता वाढवून 40 लाख रुपये करण्यात आली आहे. यावेळी परभणीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ संदीप…
Author: Lok Sanchar
परभणी,(प्रतिनिधी) : दिवाळी सण आनंदाचा, उत्साहात चा, प्रकाशाचा. सर्वत्र दिवाळी चा सण साजरा होत असताना, गोरगरिबांच्या दिवाळी पण आनंदात जावी या साठी ‘चलो जलाए दीप वहां जहां अभी अंधेरा हैं’ या उक्तिप्रमाणे येथील स्वामी विवेकानंद मित्र मंडळाच्यावतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून गरीब व गरजू कुटूंबांना शिधा वाटप करण्यात आला. जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर हे सर्व कुटूंब पाल ठोकून राहतात. या कुटूंबांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने स्वामी विवेकानंद मित्रमंडळाच्यावतीने शिधा वाटप करुन दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, गणेश निर्वळ पाटील, मिलिंद भोगवकर, वैभव मदनराव होगे, शंकर रोड़े ,गोपाल शर्मा, संतोष वहवाल, अविनाश चक्रवार, प्रवीण…
परभणी (प्रतिनिधी) शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाचे परभणी विधानसभेतील उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे सोमवारी एका पत्राद्वारे त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप माजी महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांना शिवसेना शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून यंदा विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आले. 2014 प्रमाणे यावेळेसही आनंद भरोसे यांची थेट लढत महाविकास आघाडी तथा उबाठा गटाचे डॉ.राहुल पाटील यांच्याशी होणार आहे. दरम्यान आनंद भरोसे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली असून त्यांच्या प्रचाराची पूर्ण धुरा प्रचार प्रमुख म्हणून राजू कापसे यांना देण्यात आली आहे.
परभणी, (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने परभणी जिल्हा प्रशासन हे विधानसभेची निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तयारीला लागलेले असून त्याच अनुषंगाने माध्यम कक्षामार्फत परभणी जिल्ह्यातील चार मतदारसंघांची सन 1985 ते 2019 पर्यंतची पूर्वपीठिका- माहिती पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, संतोषी देवकुळे, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी प्रमोद धोंगडे, नायब…
शिवसेना उबाठा गटाचे परभणी विधानसभेचे उमेदवार आ.राहुल पाटील यांच्या धर्मापुरी येथून प्रचाराचा शुभारंभ परभणी (प्रतिनिधी) आ. राहुल पाटील हे उध्दव ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक आहेत. त्यांचे आजपर्यंतचे काम आणि विकासाची दृष्टी पाहता मतदारही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असल्याने त्यांचा विजय निश्चित असून या निवडणुकीत महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी उद्धव सेनेच्या सर्व उमेदवारांच्या पाठीमागे एक दिलाने उभे राहावे असे आवाहन आ.सुरेश वरपुडकर यांनी केले.महाविकास आघाडी तथा शिवसेना उबाठा गटाचे परभणी विधानसभेचे उमेदवार आ.डॉ.राहुल पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ तालुयातील धर्मापुरीत मंगळवारी झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी खा. संजय जाधव, आ.सुरेश वरपुडकर, माजी खा.तुकाराम रेंगे, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, काँग्रेसचे बाळासाहेब…
परभणी (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन, परभणी जिल्हयात मागील आठवडयात विशेष मोहीमे अंतर्गत रु. ३,४८,२९० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर या विभागा मार्फत निरीक्षक राज्य उत्पादन परभणी विभागाचे निरीक्षक सु अ. चव्हाण व निरीक्षक .ए. एम. पठाण यांच्या नेतृत्वात चार पथके तयार करुन परभणी जिल्हयात विशेषत: पाथरी शहरात पारधीवाडा, इंदिरानगर, पाटील गल्ली (बाबुलतारा रोड), लहुजीनगर, रामपुरी, मानवत तालुका येथे हातभट्टी निर्मीती व विक्री केंद्रावर, अवैध दारु व वाहतुक बाबत एकुण २१ गुन्हे उघडकीस आणण्यात आलेत व आरोपींन विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे,…
वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने पुरस्कृत उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात परभणी (प्रतिनिधी) परभणी विधानसभा मतदार संघातील नेत्यांनी शहराच्या विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना मुलभूत सुविधासाठी आंदोलने करावी लागत आहे ही दुर्दैवी बाब आहे असे प्रतिपादन असे प्रतिपादन वंचीत बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार शेख नासेर शरीफ यांनी दि. 04 नोव्हेबर 2024 रोजी साय. 6.00 वा. हॉटेल सिटी पॅलेस येथील पत्रकार परिषदेत केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, शहरातील रस्त्याची दुरावस्था झालेली आहे याला सत्ताधारी नेतेमंडळी जबाबदार आहेत. शहरात रस्ते नाल्या, गटारे , स्वच्छता आदी सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. जिल्ह्यात उर्दु शाळा होत्या त्याही बंद झाल्यात. मुस्लीम समाजाची मते हवी त्यांच्या विकासाकडे लक्ष…
सेलू ( प्रतिनिधी) श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ विद्यालयातील विवेक विष्णू इंगोले याची 14 वर्षा आतील क्रिकेट स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड झाली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशाचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. युवा पिढी क्रिकेटमध्ये उत्तुंग यश मिळवणाऱ्या खेळाडूंचा आदर्श व क्रिकेट भोवती निर्माण झालेले वलय पाहून विद्यार्थी क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी धडपडत आहेत. असाच ज्ञानतीर्थ विद्यालयातील विवेक विष्णू इंगोले याने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उत्तुंग कामगिरी केली असून त्याची राज्यस्तरावर निवड झाली आहे. त्याचे पुढील स्वप्न राष्ट्रीय संघामध्ये खेळण्याकडे आहे. विवेक हा उत्कृष्ट गोलंदाज असून त्याचे कौशल्य क्रीडा शिक्षक श्री. दीपक जोरगेवार यांनी…
परभणी जिल्हा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 परभणी, (प्रतिनिधी) जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरता नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. जिंतूर विधानसभा मतदारसंघातून 24 उमेदवारांनी, परभणी विधानसभा मतदारसंघातून 21 उमेदवारांनी (31 ऑक्टोबर रोजी एक उमेदवारांनी अर्ज मागे घेतला.) गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून 13 उमेदवारांनी आणि पाथरी विधानसभा मतदारसंघातून 33 उमेदवरांनी अर्ज घेतले. जिंतूर विधानसभा मतदारसंघातून 24 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे आहेत. प्रेक्षा विजय भांबळे (अपक्ष), कदम मुंजाजी साहेबराव (अपक्ष), अंकुश सिताराम राठोड (अपक्ष), प्रदिप उर्फ बाळासाहेब महादेव काजळे (अपक्ष), खंडेराव किसनराव आघाव (अपक्ष), डॉ. पुष्कराज प्रकाशराव देशमुख (अपक्ष), बालाजी माधवराव…
पाथरी,(प्रतिनिधी) : पाथरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतीम मुदतीत म्हणजे सोमवारी (दि.04) 33 उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता एकूण 14 उमेदवार निवडणुकीत रिंगणात राहिले आहेत. यामध्ये माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, सईद खान व माधवराव फड या तीघांची उमेदवारी कायम राहिली आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघात 53 उमेदवारांनी 77 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 47 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 33 उमेदवारांनी सोमवारी रिंगणातून माघार घेतली. त्यामध्ये गोविंद मदन घांडगे (अपक्ष), गयाबाई माधवराव फड (अपक्ष), अलीशेर महेबुब पाशा (अपक्ष), दादासाहेब रामराव टेंगसे (अपक्ष), रवींद्र विठलराव देशमुख (अपक्ष), किरण राधाकिसन शिंदे (अपक्ष), रंगनाथ मोहनराव सोळंके (अपक्ष), नितीन रामराव…

