परभणी (प्रतिनिधी)- श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त परभणी शहरात रविवार दि.6 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या शोभा यात्रेत मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन आ. डॉ.राहुल पाटील यांनी केले आहे.
यंदा प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचे ठरवण्यात आले त्यानुसार समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले आहेत.यंदाचे प्रभू
श्रीराम जन्मोत्सव समिती यांचे हे 13 वे वर्ष
असून यानिमित्ताने प्रभू श्री रामाच्या जन्मोत्सवानिमित्त निघणाऱ्या भव्यशोभा यात्रेत श्रीराम प्रभूची पालखी,अयोध्या येथील प्रभू श्रीराम लल्लाची सुबक मनमोहक मूर्ती,उज्जैन येथील सुप्रसिद्ध श्रीमहाकाल डमरू पथक, श्रीराम दरबाराचा देखावा आणि बाल वानर सेना, सोलापूर येथील प्रसिद्ध हलगी पथक, उज्जैन येथील श्री महाकाल भव्य हनुमानाची मूर्ती तसेच दिल्ली कर्नाटक केरळ तेलांगणा मध्यप्रदेश राज्यातील कलापथकांचे व विविध सांस्कृतिक देखावे परभणीकर श्रीराम भक्तांना पाहण्यास मिळणार आहेत.
तसेच शोभा यात्रेमध्ये ढोल ताशा पथक शिवकालीन मर्दानी खेळांचे पथक ,लेझीम, मल्लखांब पथकांचा देखील समावेश असणार आहे एकंदरीत यंदाचा श्रीराम जन्मोत्सव अतिशय थाटामाटात आणि उत्साहात साजरा होणार आहे.दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथुन शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे.या सोहळ्यात सर्व परभणीकर राम भक्तांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आ.डॉ. पाटील यांनी केले आहे.