परभणी जिल्हा मराठी पत्रकारसंघाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप
परभणी(प्रतिनिधी) परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कारेगाव येथील वसंत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही हा डॉ. आंबेडकरांचा संदेश विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनात दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रविण धाडवे हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून पत्रकारसंघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, नजीर खान, जकीयोद्दीन खतीब, राजकुमार हट्टेकर, विठ्ठलराव वडकुते, मोईन खान, शिवशंकर सोनुने, मंदार कुलकर्णी, लक्ष्मीकांत बनसोडे, अरुण रणखांबे, तय्यब पठाण, पांडूरंग अंबुरे, अनिल दाभाडकर, प्रशांत खंदारे, राहूल वाहिवाळ, संघपाल अढागळे, राजा पुजारी, सय्यद खिजर, वैभव पुजारी, संजय घनसांवत यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका जी. व्ही. लेेंडे, मुखध्यापक पी.डी. जाधव, बबनराव धाडवे, आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना खंदारे म्हणाले की, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी संस्था करत असलेले प्रयत्न कौतूकास्पद आहेत त्याच बरोबर पत्रकार संघाने शैक्षणिक साहित्य देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उपदेश समाजापर्यंत नेण्याचे काम केले आहे. या उपक्रमाबद्दल पत्रकार संघाचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना रजिस्टर, पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गजानन मुडे तर आभार डॉ. राम गारकर यांनी मानले. या कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व नागरिकांची उपस्थिती होती.