परभणी (प्रतिनिधी) : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या विविध विषयांवरील दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. जिल्हा कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे यांच्या हस्ते या दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनात 200 पेक्षा अधिक दिवाळी अंक वाचण्यास मिळणार आहेत. याप्रसंगी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच, यावेळी उपस्थित मान्यवरांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा कोषागार अधिकारी श्री. पाचंगे व प्रमुख पाहुणे केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य राहूल नितनवरे यांनी प्रदर्शनात लावण्यात आलेल्या सर्व समावेशक दिवाळी अंकाचे अवलोकन केले व ग्रंथालयाने वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या 200 दिवाळी अंकांचा वाचनप्रेमींनी आस्वाद घ्यावा,…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी तर्फे घेण्यात आलेल्या छत्रपती संभाजी नगर विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत परभणी येथील बाल विद्या मंदिर हायस्कूल परभणीची कु. अवनी ओमप्रकाश काळे हीने १७ वर्षे वयोगट मुलीच्या बॉक्सिंग स्पर्धेत वजन गट ५७ते ६० यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलाआहे. आणि तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल कु.अवनी तिचे पालक तसेच मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन.ए. झरकर, सचिव डॉ.विवेक नावंदर, मुख्याध्यापक अरुण बोराडे उप मुख्याध्यापक आर. जी.तुम्मेवार पर्यवेक्षक पी. व्ही. रूघे, बी.के कोपरटकर सौ. एस.एम.बोके सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केलेआहे. व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
परभणी, (प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी आज गुरुवारी, दि. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.15 वाजता परभणी शहरात जिल्हास्तरीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉनची सुरुवात सकाळी 7.15 वाजता शनिवार बाजार मैदान पासून ते पुढे नानलपेठ पोलीस स्टेशन-शिवाजी चौक-गांधी पार्क-आर.आर.टावर-विसावा कॉर्नर-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने राजगोपालचारी उद्यान येथे समारोप करण्यात आला. यावेळी मतदान जनजागृती साठी शपथ देण्यात आली. मॅरेथॉनला विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मॅरेथॉनमध्ये निवडणूक निरीक्षक श्रीमती के. हरिता, निवडणूक निरीक्षक संचिता बिष्णोई, निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेश दुग्गल, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तु…
रामकृष्ण नगरात कॉफि विथ आनंदराव’ कार्यक्रम परभणी,(प्रतिनिधी) गेल्या दहा वर्षात स्थानिक लोकप्रतिनिधींनी महानगरातील अनेक प्रश्नांकडे काडीमात्र लक्ष दिले नाही. विकासाच्या गप्पा मारण्यात मात्र कृति शुन्य होते. त्यामुळे या महानगरपालिका हद्दीतील अनेक प्रश्न चिघळले. ते प्रश्न आता आ वासून उभे आहेत. त्यामुळेच परभणी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांनी केले. शहरातील रामकृष्ण नगरात मंगळवारी (दि.12) नवशा मारोती मंदिराच्या सभागृहात भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अभिषेक वाकोडकर यांच्यासह मित्र मंडळाने आयोजित केलेल्या ‘कॉफि विथ आनंदराव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नागरीकांशी संवाद साधतेवेळी भरोसे बोलत होते. परभणी सारख्या महानगरातील विकास कामे…
परभणी(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशान्वये येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने शनिवारी (दि.14) परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम 1881, बॅक वसूली प्रकरणे, मोटार अपघातांची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भू-संपादन प्रकरणे, वीज प्रकरणे (चोरीची प्रकरणे वगळून) व पाणी आकार प्रकरणे, वेतन व भत्त्यांची सेवा विषयक प्रकरणे, महसूल प्रकरणे आणि दिवाणी स्वरूपांची इतर प्रकरणे, तसेच बँकेचे वसुली वादपूर्व दाखल प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. लोकअदालतमध्ये प्रकरणात तडजोड करण्यासाठी न्यायाधीश व वकील यांचे पॅनल…
जिंतूर,(प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची निवडणूकीच्या प्रचारार्थ जिंतूरात बुधवारी (दि.13) दुपारी 2 वाजता परभणी रस्त्यावरील साई मैदानावर मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार तथा विद्यमान आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री शाह बुधवार जिंतूर येेेथे दुपाारी 2 वाजता दाखल होत आहेत. आ. सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, ज्येष्ठ नेते माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह नेतेमंडळी व पदाधिकार्यांनी सभेची तयारी पूर्ण केली असून यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी लगबग सुरू आहे. आमदार सौ. मेघना बोर्डीकर यांनी या सभेच्या निमित्ताने जिंतूर तालुका तसेच सेलू तालुक्यातील शहरासह खेड्या-पाड्यांमधून मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेत या दृष्टीने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी…
परभणी (प्रतिनिधी) 96-परभणी विधानसभा मतदारसंघात 2024 साठीच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे EVM (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) आणि VVPAT (मतदार पडताळणी पर्ची यंत्र) मशीनच्या कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पार पडली. सकाळी 9:00 वाजता स्ट्राँग रूमचे सील उमेदवारांच्या उपस्थितीत उघडण्यात आले. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी परभणी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. संदीप राजपुरे, नायब तहसिलदार अनिकेत पालेपवाड, मास्टर ट्रेनर सुभाष काचगुंडे आणि परभणी महानगरपालिका सहआयुक्त प्रज्ञावंत कांबळे हे उपस्थित होते. मतदारसंघात लढणाऱ्या उमेदवारांसह…
परभणी (प्रतिनिधी) विविध सामाजिक संघटना, मित्रमंडळ, समित्या यांची उबाठा गटाचे डॉ राहुल पाटील यांना पाठिंबा मिळत असताना शहरातील महापालिकेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील सदस्य अँड. अमोल पाथरीकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उबाठा गटात नुकताच प्रवेश केला. या प्रवेश प्रसंगी अमोल पाथरीकर यांच्यासह कार्यकर्त्यांचे आ. डॉ.राहुल पाटील यांनी स्वागत केले. शहरातील आंबेडकर नगर भागातील बुध्द विहार परिसरात झालेल्या प्रवेश प्रसंगी डॉ.विवेक नावंदर,रितेश सोळंके,गोविंद इक्कर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अमोल पाथरीकर यांच्यासमवेत निखिल डाके, संकेत गाडे, सुनील ढवळे, आस्था ढवळे, प्रवीण माने, ऋषी गायकवाड, बंटी निकाळजे, रोहिदास घनसावंत,यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. ग्रामीण भागात संवाद दौरा मंगळवारी सकाळी…
वनामकृवित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन परभणी (प्रतिनिधी)-शेती उत्पादन वाढले आहे, परंतु किडींचा प्रादुर्भाव. नैसर्गिक संकटे यामुळे शेती उत्पादनाची आणि अन्नधान्याच्या नासाडी मध्ये वाढ झालेली आहे. याबरोबरच जमिनीची प्रतही दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. यासारख्या समस्यासह सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल साध्य करणे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या महत्त्वाच्या समस्या आहेत. तसेच डिजिटल प्रणालीद्वारे संवर्धित आणि संरक्षित शेती करण्यास चालना देणे आवश्यक असल्याचे मत माजी महासंचालक पद्मभुषण डॉ आर एस परोडा यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “नेक्स्ट-जेन डिजिटल कृषीसाठी अभियांत्रिकी नवकल्पना” या विषयावर इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्सची…
परभणी, (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 अनुषंगाने मतदान दिवसाअगोदर आणि मतदानाच्या दिवशी मुद्रित (प्रिंट) माध्यमातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला अडथळा येईल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नयेत, याबाबत मुद्रित माध्यम व सर्व संबंधितांना दक्षता घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका, 2024 मतदानाच्या दिवशी ( दि. 20 नोव्हेंबर 2024) आणि मतदानाच्या एक दिवस आधी (दि. 19 नोव्हेंबर 2024) मुद्रित माध्यमांत कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य/जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (MCMC) पूर्व…

