परभणी (प्रतिनिधी) भगवंताच्या मनातील विचार म्हणजे गीता आणि भगवंताने सांगितलेले विचार म्हणजे ज्ञानेश्वरी असून गीता हा सर्व धर्मग्रंथांचा सार असल्याचं प्रतिपादन ह भ प केशव महाराज उखळीकर यांनी केले. येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळातर्फे मराठवाड्याचे लोकनेते माजी मंत्री माजी खासदार गणेशराव दुधगावकर जागतिक वत्कृत्व स्पर्धा अंतिम फेरी व बक्षीस वितरण कार्यक्रम 6 ऑक्टोबर रविवार रोजी आयोजित करण्यात आला होता, यावेळी उखळीकर महाराज बोलत होते. परभणी ही अध्यात्मिकरित्या जागतिक कीर्तीचे शहर असून वारकरी संप्रदायाचे प्रसारक संत नामदेव आणि संत जनाबाईंनी याच भूमीत जन्म घेतला आहे असेही उखळीकर म्हणाले. जो धर्माला सोडेल तो या जगात टिकणार नाही जो धर्माला धरून राहील तोच मोक्षाला…
Author: Lok Sanchar
जिंतूर (प्रतिनिधी) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनधिकृत संकुलातील वादग्रस्त गाळे रविवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवरील तत्कालीन व शासकीय प्रशासक मंडळाने गाळे उभारले होते. परंतु हे गाळे बनावट लेआऊट तयार करून उभारले गेले आहेत,अशी गंभीर तक्रार दाखल झाली, वेगवेगळ्या स्तरावरील चौकशी अखेर हे गाळे अनाधिकृत ठरवले गेले, येलदरी रस्त्यावरील हे गाळे जमीन दोस्त व्हावेत या दृष्टीने विद्यमान संचालक मंडळाने वेगवेगळ्या स्तरावर कारवाई करीत रविवारी या अनधिकृत गाड्यांवर हातोडा मारला. सकाळी पोलीस बंदोबस्तात हे गाळे हटविण्यात आले तसेच वरुड रस्त्यावरील गाळेही येथे दोन दिवसात हटवण्याचा संकल्प बाजार समितीने सोडला. दरम्यान बाजार समितीचे यार्डात अनधिकृत…