पालम (प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशाने, खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना पक्षनिरीक्षक परभणी सुभाष सोळुंके,संपर्कप्रमुख मा.सुरेशदादा जाधव, सहसंपर्क प्रमुख भास्करराव लंगोटे, युवासेना जिल्हाप्रमुख आप्पाराव वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर साहेबराव शिंदे यांची पालम युवासेना तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शिवसेना पक्षनिरीक्षक सुभाष सोळुंके यांनी नियुक्ती पत्रक देऊन अभिनंदन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख माधवराव कदम,व्यंकटराव शिंदे,महिलासेना जिल्हाप्रमुख जनाबाई मुंडे,गीताताई सुर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख एकनाथराव लोखंडे, चंद्रकांत पाटील सुर्यवंशी विधानसभा प्रमुख गंगाखेड, शिवाजीराव शिंदे विधानसभा समन्वयक, रमेश सातपुते तालुकाप्रमुख गंगाखेड, भाऊसाहेब पौळ तालुकाप्रमुख पालम, प्रकाशराव कराळे तालुकाप्रमुख पूर्णा, विशाल किरडे शहरप्रमुख पूर्णा,अर्जुन पूर्णाळे शहरप्रमुख गंगाखेड, तसेच गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) शहर महानगरपालिकेच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत श्री शिवाजी महाविद्यालयात खो खो स्पर्धा पार पडल्या.14 17 आणि 19 वर्षे वयोगटातील स्पर्धेचे उद्घाटन म.न.पा. सहाय्यक प्रज्ञावंत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळीका र्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे उपस्थित होते.या वेळी बोलताना कांबळे म्हणाले, मैदानी खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात खेळ खेळले पाहिजेत असे सांगत त्यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा.डॉ. कोकीळ म.न.पा. क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव, राजाभाऊ कामखेडे,प्रा. राजू रेंगे,जिजाऊ ज्ञानतीर्थ कैलास टेहरे, स्वीस अकॅडमी बालाजी मानोलीकर, अरबिंदो अक्षरज्योती तुकाराम शेजुळ, वरद विद्यालय कपिल निलवर्ण, आकाशकन्या निलेश राठोड, वसंतराव नाईक अमरदीप…
परभणी (प्रतिनिधी) अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. सुप्रिया श्रीनेत यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने व आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वात इंजि. सुहास पंडित यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभाग उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल माजी आमदार सुरेशदादा देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील,रामभाऊ घाडगे,माजी उपमहापौर भगवानदादा वाघमारे, शहराध्यक्ष नदीम इनामदार, माजी महापौर रवी सोनकांबळे, भीमशक्ती जिल्हाध्यक्ष सतीश भिसे तसेच परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी चे पदाधिकारी यांनी निवडीचे स्वागत व अभिनंदन केले
परभणी ( प्रतिनिधी) आधुनिकतेच्या जमान्यात टपालाचे पत्र कालबाह्य होवू लागले आहे. पूर्वी खुशाली कळवायची म्हटलं की, पत्रा शिवाय पर्याय नव्हता. आता मात्र काळ बदलला आणि सोशल मीडियाचा जमाना आला. त्यामुळे पोस्टाच्या पत्रातील सप्रेम नमस्कार, विनंती विशेष हा नव्या पिढीला अपवादानेच माहिती आहे. मात्र खऱ्या अर्थाने मामाचे पत्र मात्र हरवलं. पण असले तरी बदलत्या जमान्यात बदलाचे आव्हान टपाल विभागाने स्वीकारुन अनेक नवे उपक्रम हाती घेतले आहेत. गेल्या 25 ते 30 वर्षांपूर्वी पत्र हे अनेकांच्या आयुष्याची टपाल हीच आपल्या संपर्काचे आणि संवादाचे प्रमुख माध्यम होते. पत्र लिहिण्यास कारण की…या सुरुवातीच्या वाक्याने सुरूवात व्हायची अन संपूर्ण कुटुंबाची खुशाली कळवायची. पोस्टमन आल्यास त्याच्यामागे…
परभणी, (प्रतिनिधी) : संबंधित विभाग प्रमुखांनी शासकीय धान्य गोदामे, स्वस्त धान्य दुकाने, शाळा, अंगणवाडी येथे भेटी देवून नियतन, उचल व वाटपाचा प्रत्यक्ष आढावा घ्यावा, अशी सूचना राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष सुभाष राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिली. यावेळी राज्य अन्न आयोगाचे सचिव प. फ. गांगवे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, शिधा वाटप निरीक्षक बाजीराव तंवर, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर, शिक्षणाधिकारी (प्रा.) सुनिल पोलास, जिल्हा महिला व बालविकास अधिकिारी कैलास तिडके, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विकास मुसळे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) विशाल जाधव, प्रांत अध्यक्ष ग्राहक पंचायत विलास मोरे, शिक्षण समिती प्रमुख देवगिरी प्रांत…
परभणी,प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, नवरात्र दुर्गा महोत्सव व धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून येत्या शुक्रवारी (दि.11) राज्यस्तरीय परभणी मॅराथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्या स्पर्धेेनिमित्त जोरदार तयारी केली जात असून या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे सैराट फेम सिने अभिनेत्री रिंकू राजगुरु उर्फ आर्ची ही खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थितीत राहाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली. या स्पर्धांचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी 6 वाजता नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविन्द्रसिंह परदेशी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नीतिशा माथुर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, जिल्हा…
परभणी,(प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, नवरात्र दुर्गा महोत्सव व धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून येत्या शुक्रवारी (दि.11) राज्यस्तरीय परभणी मॅराथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून परभणी मॅराथॉन स्पर्धेनिमित्त जय्यत सुरू असून या स्पर्धे साठी तयारी सैराट फेम सिनेअभिनेत्री रिंकू राजगुरु उर्फ आर्ची यांची उपस्थिती असणार माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली. या स्पर्धांचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी 6 वाजता नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविन्द्रसिंह परदेशी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नीतिशा माथुर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, अॅड. अशोक सोनी, आंतरराष्ट्रीय…
परभणी, (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हे गुरुवार, दि. 10 ऑक्टोबर 2024 रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.गुरुवार दि. 10 ऑक्टोबर, 2024 रोजी दुपारी 2.35 वाजता हिंगोली येथून हेलिकॉप्टरने परभणी येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आगमन. दुपारी 2.40 वाजता पोलिस मुख्यालय येथून शासकीय विश्रामगृह परभणीकडे प्रयाण. दुपारी 2.50 वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथे आगमन व राखीव. दुपारी 3 ते 5 या वेळेत शासकीय विश्रामगृह, परभणी येथे विविध क्षेत्रातील तज्ञांसमवेत संवाद. रात्री शासकीय विश्रामगृह, परभणी येथे मुक्काम.शुक्रवार दि.11 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.15 वाजता शासकीय विश्रामगृह, परभणी येथून पोलिस मुख्यालयाच्या मैदानावरील हेलिपॅडकडे प्रयाण. सकाळी 9.25 वाजता पोलिस…
परभणी,(प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी सोनार समाजातील पाच वर्षाच्या अल्पवयीन मूलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील नराधमाविरुध्द प्रशासनाने पोस्को कायद्यांतर्गत खटला दाखल करीत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज संस्थानच्या पदाधिकार्यांसह सोनार समाजाच्या संतप्त नागरीकांनी केली. ही घटना माणुसकीस काळीमा फासणारी आहे. यातील आरोपी राहुल वायखिंडे याचेही दुष्कृत्य निश्चितच गंभीर आहे. त्यामुळे त्या आरोपीस कुठलीही दया-मया न दाखविता पोस्को कायद्यांतर्गत खटला दाखल करीत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी संतप्त नागरीकांनी केली. न्यायालयात खटला चालू असेपर्यंत संबंधित आरोपीस जामीन मिळता कामा नये, या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी व खटला फास्ट्रॅक न्यायालयात…
परभणी (प्रतिनिधी) आ. डॉ.. राहूल पाटील यांच्या विकासाभिमूख नेतृत्वावर विश्वास दाखवत शहरातील भीमनगर परिसरातील सामाजिक कार्यात कार्यरत असणारे पवन घाडगे व त्यांच्या शेकडो सहकाऱ्यानी आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रवेश केलेल्या सर्व तरूणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीमनगर युवा मंच यांच्या वतीने घाडगे यांच्या पुढाकारातून भव्य भिमगित संगीत रजनी व महिला मंडळ सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला परभणी विधानसभेचे आ. डॉ. राहुल पाटील, सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे, माजी शहर प्रमुख अनिल डहाळे, माजी नगरसेवक प्रशास ठाकूर, जेष्ठ नेत्या राणुबाई वायवळ,…