परभणी (प्रतिनिधी) शहर महानगरपालिकेच्या DAY -NULM अंतर्गत परभणी शहरातील साखला प्लॉट, रेल्वे स्टेशन परिसर येथे परभणी शहरात आढळून येणा-या बेघर व्यक्तींसाठी सावली नावाचे बेघर निवारा केंद्र उभारण्यात आलेले आहे. सदर बेघर निवारा केंद्र येथील सर्व व्यवस्था पाहण्यासाठी महानगरपालिके मार्फत सावली प्रतिष्ठान, परभणी या एजन्सीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या या बेघर निवारा केंद्रात 30 बेघर व्यक्ती राहत असून असून त्यामध्ये 10 महिला व 20 पुरुष आहेत. यामध्ये बेघर व्यक्तींना राहण्यासाठी त्यांना स्वतंत्र कक्ष, पलंग, गादी, थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपडे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच आंघोळीसाठी गरम पाणी व्यवस्था आहे. तसेच सकाळी 7 वाजता चहा 8.30 वा., नाष्ट्यामध्ये पोहे,…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) येथील एका शेतकऱ्याकडून १५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.२६) मानवत (ग्रामीण) शाखा-1 महावितरणच्या कंत्राटी तंत्रज्ञाला रंगेहाथ पकडले. त्याच्यासह याप्रकरणात सामील असलेल्या शाखा अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक माहिती अशी की, शेतातील वीजपुरवठा करणारे रोहित्र पावसाळ्यापासून बंद असल्याने संबंधित शेतकऱ्याने मानवत येथील महावितरण कार्यालयातील शाखा अभियंत्याकडे धाव घेतली होती. या संबंधित शाखा अभियंता मोहम्मद तलहा मोहम्मद हिमायत यांने हे काम मार्गी लावण्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे १५ हजाराची मागणी केली होती. मात्र संबंधीत शेतकऱ्याला लाच द्यायची नसल्याने त्याने परभणीतील एसीबी कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. दरम्यान याप्रकरणी एसीबीच्या पथकाने मंगळवारी तक्रारीची पडताळणी केली. आणि…
पालम (प्रतिनिधी)महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी निवड व्हावी या साठी नवसाला पावणारा मारुती भोगाव( तालुका पूर्णा) येथे महारुद्र अभिषेक करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत महायुती ला प्रचंड बहुमत मिळाल्या नंतर आता मुख्यमंत्री कोण? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. यात प्रामुख्याने बीजेपी कडून ना.देवेंद्र फडणवीस तर शिवसेना कडून ना. एकनाथ शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. अजितदादा पवार गटाने फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसुन यावर चर्चा करणार असल्याचे समजते. मात्र सर्वसामान्य कार्यकर्ते आपापल्या नेत्याने मुख्यमंत्री व्हायला पाहिजे यासाठी देवाकडे साकडे घालत आहेत. पालम तालुका शिवसेना कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा…
परभणी (प्रतिनिधी)3 डिसेंबर 1939 रोजी मराठी पत्रकार परिषदेची मुंबईत स्थापना झाली.. मराठी पत्रकार परिषदेचा हा स्थापना दिवस राज्यात गेली दहा वर्षे “पत्रकार आरोग्य दिन” म्हणून साजरा केला जातो..या दिवशी स्थानिक डॉक्टर्सच्या मदतीने पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात.. गंभीर आजाराचा रूग्ण सापडल्यास त्यास मुंबईस पाठवून त्याच्यावर उपचार केले जातात.. गेल्या वर्षी पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांना राज्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.. राज्यातील 265 तालुक्यात ही शिबिरं झाली.. त्यात 10,000 पेक्षा जास्त पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली.. हा जागतिक विक्रम होता.. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी म्हणजे 3 डिसेंबर 2024 रोजी राज्यात पत्रकार…
परभणी (प्रतिनिधी) संविधान दिना निमित्त आज मंगळवार दि.26 रोजी परभणी शहर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त निमिनाथ दंडवते, उपायुक्त बबन तडवी, मुख्य लेखाधिकारी डॉ.प्रभाकर काळदोते, लेखा परिक्षक डॉ. श्रीरंग भुतडा यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार आर्पण करून अभिवादन करण्यात आले व संविधान दिना निमित्त अधिकारी, कर्मचारी समवेत संविधान उद्देशीकेचे वाचन करण्यात आले. यावेळी म.न.पा.लेखाधिकरी भगवान यादव, मुरारजी, सावंत, नगर सचिव विभागाचे विकास रत्नपारखे, संकिर्ण विभाग राजकुमार जाधव, शिक्षण विभाग मंजुर हसन, पाणी पुरवठा विभाग तन्वीर बेग, अदनान कादरी, माहीती व जनसंपर्क विभाग उमेश जाधव, कर्मचारी संघटना अध्यक्ष के.के.आंधळे, शेख मैहमुद, लेखा विभागचे रमेश चव्हाण, आदी अधिकारी, कर्मचारी मोठ़या संख्येने…
पालम(प्रतिनिधी) वैराग्यमूर्ती ब्रह्मनिष्ठ सदगुरु श्री बाळकृष्ण महाराज यांची 121 वी पुण्यतिथी पर्वकाळ निमित्त पालम येथे अखंड हरिनाम सप्ताह चातुर्मास समाप्ती ज्ञानेश्वरी पारायण श्री दत्त याग व श्री मदभागवत कथा दिनी ज्ञानयज्ञ सोहळा प्रारंभ आज दिनांक 25 नोव्हेंबर 2024 सोमवार रोजी कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. दैनंदिन कार्यक्रम काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण व भागवत पठण गाथा भजन भागवत कथा व प्रवचन धूप आरती हरी कीर्तन हरीजागर सदरील कार्यक्रमास गाथा प्रमुख हभप मंचक महाराज गोळेगावकर हभप दत्ता महाराज पिंपरीकर , ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख हभप शाहूराव महाराज पत्की कीर्तन वीणाप्रमुख हभप अण्णा महाराज सर्फराजपूरकर हभप नामदेव गुरुजी पालमकर , दिनांक 25 नोव्हेंबर 2024 सोमवार रोजी हभप श्री…
सेलू : (प्रतिनिधी) श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. संविधान दिन दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. याच दिवशी देशांमध्ये संविधान लागू करण्यात आले होते. यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्राचार्या प्रा. प्रगती क्षीरसागर व सर्व शिक्षक उपस्थित होते. शाळेमधील अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
नूतन कन्या प्रशालेत संविधान दिन साजरा सेलू (प्रतिनिधी) भारतीय संविधानाने आपल्याला जशी मुलभूत अधिकार दिली आहेत. तशीच कर्तव्यही दिली आहेत. तेव्हा विद्यार्थी आणि नागरिकांनी आपल्याला मिळालेल्या मुलभूत अधिकारासह कर्तव्याची जाणीवही ठेवावी. एक आदर्श आचारसंहिता असलेले भारतीय संविधान हा मानवतावादी धर्म ग्रंथ आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. ते श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने शासनाच्या ‘ हर घर संविधान ‘ उपक्रमांतर्गत मंगळवार ( दि. २६ ) रोजी आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक निशा पाटील या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे…
परभणी, (प्रतिनिधी) जायकवाडी कालव्यातून रब्बी हंगामासाठी ३ व उन्हाळी हंगामासाठी ४ पाणी आवर्तनांना तसेच निम्न दुधना कालव्यातून रब्बी हंगामासाठी ३ पाणी आवर्तन व उन्हाळी हंगामासाठी ३ पाणी आवर्तनांना छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडून मंजुरी मिळाली असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी कळविले आहे. जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या जायकवाडी डावा कालवा व निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून पाणी आवर्तन सोडण्यासाठी कालवा सल्लागार समितीची विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज छत्रपती संभाजीनगर येथे आढावा बैठक पार पडली. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार आज २५ नोव्हेंबर रोजी जायकवाडी व दि. २६ नोव्हेंबर २०२४ निम्न दुधना प्रकल्पाचे कालव्यातून पाणी सोडण्यात…
परभणी, (प्रतिनिधी) नेहरु युवा केंद्र कार्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 12 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान दिल्ली येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, दि. 5 डिसेंबर 2024 पर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे. एक लाख युवा नेत्यांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण व्हावे, त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी असू नये, असे युवा नेते या कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडण्याचे प्रधानमंत्र्यांचे व्हीजन आहे. या युवा महोत्सवाच्या कार्यक्रमात निवड झालेल्या नेत्याला 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी प्रधानमंत्र्यांसमोर आपले विचार, कल्पना आणि मत मांडू शकणार आहेत. युवा नेता निवडीसाठी 15 ते 19 वर्षे वयाची मर्यादा असून, त्याने एमवाय डॉट जीओव्ही डॉट इनवर ऑनलाईन…

