परभणी,(प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने बुधवारी (दि.09) मुंबईतून विधानसभा मतदारसंघांतर्गत दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात परभणी मतदारसंघातून माजी उपमहापौर सय्यद समी सय्यद साहेबजान उर्फ माजू लाला यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
आज बुधवारी (दि 9) वंचित बहुजन आघाडीने मुंबईतून दुसरी यादी जाहीर केली. त्या यादीत परभणी विधानसभा मतदार संघा साठी माजी उपमहापौर माजू लाला यांना उमेदवारी जाहीर केली. गेल्या चार महिन्यांपूर्वीच माजू लाला हे शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाले होते. परंतु, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माजू लाला यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली.
Friday, July 18
ताज्या बातम्या:
- कृषि पंप योजनेवरुन सरकारला धरले धारेवर ; आ.डॉ.राहुल पाटील विधानसभेत आक्रमक-लक्षवेधीद्वारे वीज समस्यांकडे वेधले सरकारचे लक्ष
- संबर येथील अपहरण आणि खून प्रकरणातील पाच आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हा शाखा व परभणी ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई
- उद्यापासूनच जिल्ह्यातील कॅनॉल व माजलगाव धरणात पाणी सुटणार; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बैठकीत माहिती
- पालकाच्या मृत्यूप्रकरणात निवेदन सादर करा; आ.डॉ राहुल पाटील यांच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांच्या सूचना
- भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांचा मदतीचा हात; ह.भ.प. जगन्नाथ महाराज हेंडगे मृत्यू प्रकरणातील पीडित कुटुंबास दोन लाखांची आर्थिक मदत
- जायकवाडी डाव्या कालव्या मार्फत शेतीसाठी पाणी सोडावे युवक काँग्रेसची मागणी
- आ राजेश विटेकर यांनी विधान सभेत उपस्थित केलेल्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन वर कार्यवाही
- “त्या” संस्थाचालकाचे बँक खाते फ्रिज करावे- सिद्धार्थ पानबुडे ; मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन