परभणी (प्रतिनिधी) ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या सिद्धेश्वर विद्यालय जिंतूर या शाळे चा जिंतूर शहरात दहावीच्या निकालामध्ये द्वितीय क्रमांक. शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये लागलेल्या इयत्ता दहावीच्या निकालामध्ये जिंतूर येथील सिद्धेश्वर विद्यालयाचा निकाल 96.66% इतका लागला असून सेमी इंग्लिश चा निकाल सलग चौथ्या वर्षी 100% लागलेला आहे
यात विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर तथा सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना अभिनंदन तथा शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार एडवोकेट गणेश रावजी दुधगावकर संस्थेच्या सचिव डॉ संध्याताई दुधगावकर संस्थेचे सहसचिव समीर भाऊ दुधगावकर यांनी केले.
क्रीडा सांस्कृतिक स्काऊट गाईड नाटक बालनाट्य या क्षेत्रातील नावलौकिका बरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील निकालही या शाळेची जिंतूर शहरातील आपली ओळख वाढवत आहे.
एकूण 90 विद्यार्थ्यांपैकी 87 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पाच विद्यार्थी डिस्टिंक्शन आणि 38 विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये पास झाले आहेत जिंतूर शहराबरोबरच आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये याबद्दल अभिनंदन केले जात आहे.