परभणी (प्रतिनिधी) येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.भीमराव खाडे यांना बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीने राज्यस्तरीय विद्या भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार त्यांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्धल मिळाला आहे. उच्च शिक्षणातील रसायनशास्त्रा बरोबरच त्यांनीएलएल.बी, मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मीडिया सायन्स आणि डिप्लोमा इन हुमन राईट हे शिक्षण घेतले आहे.छत्तीस वर्षाच्या सेवेतील त्यांचा कार्यकाळ हा प्रेरणादायी ठरणारा आहे. दोन युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे आणि एक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा रसायनशास्त्र विषयाचे प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ विद्यार्थ्यांनी पीएच.डी.साठीचे संशोधन पूर्ण केले आहे आणि दोन विद्यार्थ्याचे संशोधनाचे काम अंतिम टप्प्यात आहे.याचबरोबर त्यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये सत्तर शोधनिबंध आणि सहा संदर्भ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत तसेच विविध वर्तमानपत्रातून आणि विशेषांकात अनेक पॉपुलर आर्टिकल प्रसिद्ध केले आहेत. जवळपास एकशेबारा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला आहे यात प्रामुख्याने शोधनिबंधाचे वाचन आणि सत्राची अध्यक्षता भूषविली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्राच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य असून अनेक प्राधिकरणावर त्यांचा सहभाग आहे.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल मार्गदर्शन, नवीन शैक्षणिक धोरणाचा प्रचार आणि प्रसार,ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज सारखे प्रश्न, सामाजिक आणि धार्मिक चळवळीमध्ये त्यांचा असलेला सहभाग.या कार्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांना उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून गौरविले आहे. याचबरोबर देशातील अनेक नामांकित पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. राज्यस्तरीय विद्याभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.


