परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, पाथरी व गंगाखेड या चार विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 48.84 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिलेले माहितीनुसार जिंतूर मतदारसंघात 49.2, परभणीत 44.99, गंगाखेडात 51.75 तर पाथरीत 48.8 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या चारही मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाचा वेग वाढेल, असे अपेक्षित होते. परंतु, चारही मतदारसंघात फारशा वेगाने मतदान झाले नाही. सकाळपासूनच मतदान टप्प्या टप्प्याने व संथ गतीने सुरु आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर मतदानाचा वेग वाढेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. सकाळी 7 वाजता मतदानाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला. तेव्हा सर्वसामान्य मतदारांनी त्या…
Author: Lok Sanchar
परभणी, (प्रतिनिधी ) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. परभणी जिल्ह्यात सकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान सरासरी 6.59 टक्के मतदान झाले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले. परभणी जिल्ह्यातील 95-जिंतूर विधानसभा मतदारसंघात 6.92 टक्के मतदान झाले असून, 96-परभणी विधानसभा मतदारसंघात 7.1 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर 97-गंगाखेड विधानसभा मतदारसंघात 5.16 टक्के आणि 98- पाथरी विधानसभा मतदारसंघात 7.36 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. जिल्ह्याची टक्केवारी – 6.59% मतदार संघ टक्केवारी १) 95-जिंतूर – 6.92 % २) 96-परभणी – 7.1% ३) 97-गंगाखेड- 5.16% ४)…
मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे* – पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी परभणी जिल्ह्यात मतदानासाठी मतदान केंद्र सज्ज परभणी,(प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी, (दि.20) मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते सांयकाळी 6.00 पर्यंत आहे. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. तर मतदानाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले…
मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे- पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी परभणी जिल्ह्यात मतदानासाठी मतदान केंद्र सज्ज परभणी, (प्रतिनिधी)विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी, (दि.20) मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते सांयकाळी 6.00 पर्यंत आहे. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. तर मतदानाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.…
सेलू (प्रतिनिधी) येथे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी रांगोळी उपक्रमातून सोमवार ( दि.१८ ) रोजी मतदार जनजागृती करण्यात आली. रांगोळी उपक्रमास शहरात शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. २० नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावंडे , जिल्हास्तरीय स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी , तहसीलदार डॉ. शिवाजी मगर , गटशिक्षणाधिकरी उमेश राऊत यांच्या मार्गदर्शनात सेलू गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी शहरातील नूतन विद्यालय, ज्ञानतीर्थ विद्यालय , यशवंत विद्यालय , न्यू हायस्कुल , के.बा. विद्यालय , नूतन इंग्लिश स्कुल , के.जी.बी.व्ही शाळा , विवेकानंद प्राथमिक विद्यालय , यासेर उर्दू शाळा…
परभणी,(प्रतिनिधी)— विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानासाठी जिल्हयातील परभणी, गंगाखेड, जिंतूर व पाथरी या विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य सोबत घेऊन अतिशय उत्साहाच्या वातावरणात कर्मचारी आज रवाना झाले. परभणी येथील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ठेवण्यात आलेले मतदान साहित्य परभणी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी सकाळीच कर्मचारी आले होते. यावेळी निवडणूक निरीक्षक श्रीमती के. हरिता, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, परभणी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी…
परभणी,(प्रतिनिधी) : येथील पाथरी रोडवरील एस.डि.मेसॉक फाउंडेशन संस्थेच्या सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालय व पोस्ट ग्रॅज्युऐट रिसर्च सेंटर मध्ये 12 नोव्हेंबर रोजी बी.डी.एस. या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या 100 विद्यार्थ्यांचा स्वागत व व्हाईट कोट सेरेमनी सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष व संचालक डॉ. प्रफुल्ल पाटील व संचालिका डॉ. सौ. विद्या प्रफुल्ल पाटील उपस्थितीत होते. संस्थेच्या बी.डी.एस. (100 विद्यार्थी क्षमता), एम.डी.एस.(28 विद्यार्थी क्षमता), डॉ. प्रफुल्ल पाटील बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालय (60 विद्यार्थी क्षमता) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे या सोहळ्याद्वारे स्वागत करण्यात आले. दंत शल्यचिकित्सा या वैद्यकीय शाखेच्या प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याचा आगळा-वेगळा पायंडा डॉ.प्रफुल्ल पाटील यांनी…
परभणी,(प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी परभणी जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यामधील 95-जिंतूर, 96-परभणी, 97-गंगाखेड व 98-पाथरी या चारही विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर, 2024 रोजी बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याकरिता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यातील चारही मतदार संघातील मतदान केंद्रावर मतदानाचे दिवशी मतदान केंद्राचे…
वालुर (प्रतिनिधी) येथील रहिवासी श्रीकिशन बसप्पा चिलवंत यांचे सोमवार दि 18 रोजी दुपारी 4 वाजता निधन झाले. मृत्यूसमयी ते 89 वर्षाचे होते. त्यांच्यावर उद्या मंगळवारी दि 19 रोजी सकाळी 10 वाजता वालुर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणारे आहेत.
पालम (प्रतिनिधी) विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदाना वेळी मतदार यादीत नाव असणाऱ्या मतदारांसाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यावर मतदारांना मतदान करता येईल, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सदरील पुरावे ग्रहय धरले जाणार असल्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आव्हान पालम तहसीलदार तथा सहायक निवडणूक अधिकारी माहिती दिली आहे. मतदार ओळख पत्रावर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मात्र मतदार यादीत नाव असूनही ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही अशांसाठी १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. मतदाराने पत्त्यात बदल केला असेल तर मात्र नवे ओळखपत्र मिळाले नसल्यास माहितीच्या ओळखपत्रावर मतदान करता येईल. मात्र…

