परभणी, (प्रतिनिधी) : मान्सून कालावधीत विशेषतः जून ते सप्टेंबर या महिन्यात वीज पडून जिवीत व वित्त हानी होते. ही जिवीत व वित्त हानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी “दामिनी”अॅप तयार केले आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा.
“दामिनी” अॅप जीपीएस लोकेशनच्या आधारे काम करते. वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. ॲपच्या माध्यमातून आपल्या सभोवतालच्या परिसरात वीज पडणार असल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणापासुन सुरक्षित स्थळी जावे. अशा वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये. याबाबतच्या सूचना अॅपद्वारे वापरकर्त्यांना दिल्या जातात. त्यामुळे नागरिकांनी “दामिनी” ॲप हे गुगल प्ले स्टोअरवर डाऊनलोड करावे. तसेच हे ॲप वापरण्याबाबत इतरांनाही सांगावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
*-*-*-*


