पालम प्रतिनिधी ) दिनांक 14 फेब्रुवारी मार्च 2025 च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ममता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अंबोरे सर आणि प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारूती कारवार तसेच माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर श्री गुडदे सर आणि माजी मुख्याध्यापक श्री कानगुले सर हे होते शालांत प्रमाणपत्र परीक्षेत एकूण 272 विद्यार्थी परीक्षेला बसली त्यापैकी 253 उत्तीर्ण झाले विद्यालयाचा निकाल सरासरी 93% लागला 90% पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी 34 असून त्यांचा विद्यालयातर्फे आज सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख अतिथी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री खांडेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन पौळ सर तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीमती मारला पल्ले मॅडम यांनी केले या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालक ममता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कर्मचारी उपस्थित विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन बळीराजा शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा संचालक आदरणीय गोळेगावकर नाना तसेच बळीराजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुषार भैय्या गोळेगावकर, जेष्ठ संचालिका चित्रा ताई गोळेगावकर आणि प्रशासकीय अधिकारी सोळंके यांनी अभिनंदन केले.
Friday, July 18
ताज्या बातम्या:
- कृषि पंप योजनेवरुन सरकारला धरले धारेवर ; आ.डॉ.राहुल पाटील विधानसभेत आक्रमक-लक्षवेधीद्वारे वीज समस्यांकडे वेधले सरकारचे लक्ष
- संबर येथील अपहरण आणि खून प्रकरणातील पाच आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हा शाखा व परभणी ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई
- उद्यापासूनच जिल्ह्यातील कॅनॉल व माजलगाव धरणात पाणी सुटणार; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बैठकीत माहिती
- पालकाच्या मृत्यूप्रकरणात निवेदन सादर करा; आ.डॉ राहुल पाटील यांच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांच्या सूचना
- भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांचा मदतीचा हात; ह.भ.प. जगन्नाथ महाराज हेंडगे मृत्यू प्रकरणातील पीडित कुटुंबास दोन लाखांची आर्थिक मदत
- जायकवाडी डाव्या कालव्या मार्फत शेतीसाठी पाणी सोडावे युवक काँग्रेसची मागणी
- आ राजेश विटेकर यांनी विधान सभेत उपस्थित केलेल्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन वर कार्यवाही
- “त्या” संस्थाचालकाचे बँक खाते फ्रिज करावे- सिद्धार्थ पानबुडे ; मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन