परभणी (प्रतिनिधी) येथील जेष्ठ नागरिक श्रीमती प्रभावती बाळकृष्णराव मुळे यांचे शनिवारी सायंकाळी पाच वाजता वृद्धकाळामुळे निधन झाले, त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी दहा वाजता जिंतूर रस्त्यावरील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी शिवाजीनगर येथील डॉक्टर प्रकाश मुळे यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे.
दरम्यान श्रीमती मुळे यांच्या पश्चात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रकाश मुळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक डॉ. प्रमोद मुळे ,ज्ञानोपासक महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक रविंद्र मुळे यांच्यासह सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.