पालम (प्रतिनिधी) पावसाळा अगदी दारावर येऊन थांबला असताना सुद्धा पालम ते राणी सावरगाव या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नसून हे काम अत्यंत संत गतीने चालू आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांची गैरसोय होत असून शेतीकामासाठी तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर जाता येता सुद्धा शेतकऱ्यांना येत नाही

पालम ते राणीसावरगाव रस्त्याच्या कामासाठी खुप वर्ष प्रतीक्षा करण्यात आली विविध संघटना राजकीय पक्ष आपापले मतभेद विसरून हा रस्ता व्हावा यासाठी आंदोलन करण्यात आली. आणी त्यांच्या प्रयत्नांना यश आले रोडचे काम पण दिपवाळी झाल्यानंतर सुरुवात झाले पण ते काम एवढे संथ गतीने सुरुवात आहे की पाऊसाळा सुरु होण्यास अवघे कधी दिवस शिक्कल आहेत अजुन पर्यंत पक्या कामाला सुरुवात झाली नाही थोडा पाऊस पडला की मोटारसायकल धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे असून वळिंबा नसून खोळबा अशी गत वाहन धारकांची झाली आहे पालम हे तालुक्याचे ठिकाण आहे पालम तालुक्याशी ह्या रोडने येणाऱ्या गावांची सख्या पण जास्तीची आहे जवळपास ते रोज ये जा करत असतात आता शेतकरी वर्गाला खत बी बियाणे व इतर सामान तसेच विध्यार्थी पालक यांना कागदोपत्री कामानिमित्त पालम येथे ये जा करावे लागत आहे तरी पण गुत्तेदार यांनी रोडचे काम फारच संथ गतीने करत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज आहे रोडचे काम पक्के लवकरात लवकर करावे अशी प्रवाश्यातून चर्चा होताना दिसत आहे तसेच पेठपिंपळगाव ते मुदखेड रस्त्याचे काम पण धिम्या गतीने सुरु आहे दोन्ही रोडची कामे लवकरात लवकर करून रस्ता रहदारीसाठी मोकळा करावा


