परभणी (प्रतिनिधी) बाल विद्या मंदिर हायस्कूल विभागांमध्ये आज दिनांक 26.02 2026 रोजी संस्थेचे सन्माननीय सचिव मा. डॉ. विवेक नावंदर यांच्या शुभहस्ते आयुका, पुणे येथे विज्ञान वारीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा, शिष्यवृत्ती पूर्व परीक्षा, एन एस ओ ऑलंपियाड स्पर्धा परीक्षा व पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय परभणी येथे आयोजित प्रेरणा उत्सव मध्ये सहभागी होऊन यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संस्था सचिव मा. डॉ. विवेक नावंदर प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार प्रशालेचे पर्यवेक्षक बळीराम कोपरटकर क्रीडा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर पंडित, विज्ञान शिक्षिका जयश्री महामुने, गजानन जुमडे व महेश फड, गजानन लोणसने व कलाध्यापक केशव लगड यांची उपस्थिती होती.
*आयुका, पुणे येथे विज्ञान वारी* करिता पात्र विद्यार्थी वर्ग सातवा
आरव मनोज टिकायत,हर्षल तुषार कल्याणकर, अंश अभिमान सोनकांबळे
*नवरचना प्रतिष्ठान आयोजित शिष्यवृत्ती पूर्व परीक्षा*
अवधूत अतुल करमाळकर, वर्ग ५ वी प्रथम पारितोषिक ३०००/प्राप्त.
*एन एस ओ ऑलंपियाड स्पर्धापरीक्षा* *सुवर्णपदक प्राप्त*
अथर्व अतुल करमाळकर
*केंद्रीय शिक्षण अनुसंधान नवी दिल्ली तर्फे आयोजित *पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय अंतर्गत प्रेरणा उत्सव*
वर्ग आठवा
साईराम प्रमोद दूदेवाड
श्रीजा श्रीधर पांढरकर यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी वडनगर गुजरात येथे निवड झाली आहे.
या शिवाय मृणाल देशमुख,आर्या गिरी, साची लव्हांडे, अनघालक्ष्मी शिवलाड यांचा या स्पर्धेत सहभाग होता.
या विविध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख व कलाध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव मा. डॉ.विवेक नावंदर प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे उपमुख्याध्यापक रामदास तुमेवार पर्यवेक्षक बळीराम कोपरटकर व मार्गदर्शक शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.
.


