परभणी,(प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त आयुर्वेद व्यासपीठ परभणीच्या वतीने निरामय योग केंद्र, परभणी येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात संभाजीनगर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दिपाली देशमुख यांनी ‘महिलांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांनी दैनंदिन जीवनातील ताणतणाव कसा हाताळावा, मानसिक आरोग्य कसे जपावे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी अॅड. मंजुषा बागल यांनी ‘सायबर क्राईम’ या विषयावर मार्गदर्शन करत महिलांनी सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी तसेच कायदेशीर उपाययोजना याबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमाला परभणी शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयुर्वेद व्यासपीठ परभणीचे अध्यक्ष विनोद पत्की, उपाध्यक्ष विद्या भालेराव, सचिव गुरुदत्त चौधरी यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पारवे यांनी केले. यावेळी कुणाल कौसडीकर, स्वप्नजा कळमकर, सहसचिव पूजा बाहेती, स्मिता कुलकर्णी, मेघना मुंदडा तसेच इतर महिला सदस्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


