परभणी,(प्रतिनिधी) परभणी येथील धनेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित परभणी नर्सिंग कॉलेजने बीएससी नर्सिंग परिक्षेत 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
आ.डॉ.राहुल पाटील यांच्या धनेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नर्सींग कॉलेजने मागील काही वर्षापासून परीक्षेत 100 टक्के निकालाची परंपरा सुरू केली आहे. यंदा झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत महाविद्यालयाचा
नावलौकिक वाढवला आहे. याबद्दल आमदार डॉ. राहुल पाटील यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.एस.आरती यांनी देखील महाविद्यालयाच्या यशाचे श्रेय विद्यार्थी आणि प्राध्यापकांना दिले आहे. भविष्यातही अशीच यशस्वी परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला तसेच परभणी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता आणि संचालक डॉ. प्रमोद शिंदे यांनी देखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून परभणी मध्ये आरोग्य क्षेत्रात काम करण्यासाठी प्रशिक्षित व कुशल नर्सिंग मनुष्यबळ तयार होणे ही काळाची गरज आहे. या निकालामुळे त्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडत आहे असे मत व्यक्त केले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


