Author: Lok Sanchar

परभणी,(प्रतिनिधी) : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुरमितसिंग उर्फ रिंकूसिंग रणबिरसिंग टाक या सेल्समनला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. नायर यांनी तीन वर्षे सश्रम कारावास 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास पोक्सो कायद्यान्वये तर भादंवि कलम 452 प्रमाणे 1 वर्षे सश्रम कारावा, 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिने साध्या कारावासाची शिक्षा सूनावली आहे. 6 ऑगस्ट 2023 रोजी अल्पवयीन मुलगी घरी असतांना या सेल्समनने तीचा विनयभंग केला. तीने आरडाओरडा केल्यानंतर आई धावून आली. तेव्हा आरोपीने गालात जोरदार चापट मारली व तेथून तो फरार झाला. या प्रकरणात नानलपेठ पोलिस ठाण्यात…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : येथील पाथरी रस्त्यावरील आरपी हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट वैद्यकीय महाविद्यालयात एका 65 वर्षीय महिलेच्या पोटातून दहा किलोचा गोळा शस्त्रक्रिया करुन काढण्यात आला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एक 65 वर्षीय महिलेच्या पोटात सतत दुखत असल्याने त्यांनी आर. पी. हॉस्पिटल येथे शैल्यचिकित्सक डॉ. अमीर तडवी, डॉ. भीमराव कनकुटे यांना दाखवले. त्यावेळी त्यांनी केलेल्या सोनोग्राफी तपासणीमध्ये महिलेच्या पोटात दहा किलो वजनाचा गोळा तसेच गर्भपिशवी देखील खराब झाल्याचे आढळून आले, त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याने हॉस्पिटलने तात्काळ महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रियेची परवानगी घेतली. दोन तासापेक्षा अधिक झालेल्या शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून दहा किलोचा गोळा आणि गर्भपिशवी काढण्यात आली. त्यामुळे…

Read More

परभणी (प्रतिनिधी) विविध धर्मांना, भाषा,प्रांत अनेक संस्कृतींना तसेच देशातील साडेसहा हजार जातींना एकत्र जोडण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे, “खऱ्या अर्थाने सर्व भारतीयांचा धर्मग्रंथ हा संविधानाचा आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकोडे यांनी केले. संविधान सन्मान रॅलीला वाकोडे यांची विशेष उपस्थिती होती. शहरात 29 नोव्हेंबर 2024 रोजी शनिवार बाजार येथून सकाळी दहा वाजता आयोजक आम्ही तुम्ही सर्व भारतीय या बॅनरखाली भव्य प्रमाणात संविधान जनजागृती मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकी मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरां चा सजीव देखावा एका लहान मुलाने साकारला होता त्या सोबत संविधानाची प्रत आणि भारतीय लेखणी प्रती रुपी ठेवण्यात आली होती. मिरवणुकी मध्ये अनेकांच्या हातात…

Read More

परभणी(प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त परभणीत 3 डिसेंबर रोजी पत्रकार व त्यांच्या कुटूंबीयांची आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन परभणीतल्या देवगिरी मल्टीसुपरस्पेशालीटी हॉस्पीटल या ठिकाणी आयेाजित केली आहे. परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि देवगिरी सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलच्या वतीने ही आरोग्य तपासणी करण्यात येणार असून यामध्ये विविधि प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत तर जवळपास 10 सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांची टिम तपासणी करणार आहेत. याच शिबीरात इच्छूक पत्रकार व नागरिकांसाठी रक्तदान शिबीराचं आयोजन देखील करण्यात आले आहे. या शिबीराचा जिल्हाभरातील पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पत्रकार संघ आणि देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबीरात शुगर,…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : येथील चतुरंग प्रतिष्ठानच्यावतीने 1 व 2 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेत 1 डिसेंबर रोजी सौ. सिताबाई मोहिते व 2 डिसेंबर रोजी प्रा. गणेश शिंदे हे या दोघा वक्त्यांचे व्याख्यान होणार आहे. वसमत रस्त्यावरील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी 6 वाजता आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेत 1 डिसेंबर रोजी सौ. सिताबाई मोहिते (जालना) या ‘मी केले तुम्ही करा, उद्योगाची कास धरा’ या विषयावर तर 2 डिसेंबर रोजी प्रा. गणेश शिंदे (अहिल्यानगर) हे ‘संत परंपरा व आजची पिढी’ या विषयावर विचार मांडणार आहेत. यावर्षी व्याख्यानमालेचे हे 20वे वर्ष आहे. या व्याख्यानमालेत दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणार्‍या…

Read More

परभणी (प्रतिनिधी) – विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात छत्रपती संभाजी नगर येथे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रार करण्यासाठीचे अर्ज विहित मुदतीत नमुना प्रप्रत्र-1 (क) मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब तहसीलदार) यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहेत. विहित नमुना अर्ज प्रप्रत्र-1 (क) आवक शाखेत उपलब्ध करून देण्यात आला आहे. विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पिडीत महिलांनी विहीत नमुन्यातील मुदत पुर्व अर्ज विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास, तथा…

Read More

गंगाखेड,(प्रतिनिधी) : येथील एका विद्यालयातील एका शिक्षकाने पत्नी व मुलीसह गुरुवारी (दि.28) दुपारी 3 वाजेच्या सुमारास एका मालगाडीसमोर झोपून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. अधिक माहिती अशी की रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या धारखेड शिवारात रेल्वे पुलावर शहरातील एका विद्यालयातील मसनाजी सुभाष तुडमे (वय 45) या शिक्षकाने पत्नी व मुलीसह रेल्वे मार्गावर झोपून आत्महत्या केली. त्या तीघांचे मृतदेह आढळून आल्याबरोबर प्रत्यक्षदर्शनींनी ती गोष्ट तात्काळ पोलिसांना कळविली. उपविभागीय अधिकारी दिलीप टिप्परसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आसेफ शेख, जमादार दिपक वावळे यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेवून ओळख पटविण्याचे काम सुरु केले तेव्हा खिशात सापडलेल्या मोबाईलवरुन समोरच्या व्यक्तीस संपर्क केल्यानंतर आत्महत्या…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त समाज कल्याण कार्यालयात नुकतेच संविधान अमृत महोत्सवाचे अयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचे उपायुक्त प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते तसेच समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गुठ्ठे व कार्यालय अधीक्षक बी.एल. स्वामी यांची उपस्थिती होती. समाजातील प्रत्येकाने आपली मूलभूत कर्तव्ये आणि देशाचे कायदे अंगीकृत करून त्याचे पालन केले पाहिजे तसेच देशातील नागरिकांमध्ये संविधानिक मूल्याबद्दल आदराची भावना वाढविणे हा संविधानाचा मुख्य उद्देश आहे. भारतातील विविध जाती-धर्म आणि कोट्यवधी जनतेला एकत्रित करणारी ही राज्य घटना आहे. त्या राज्यघटनेचा गौरव करण्यासाठी आपण हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा करतो. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या…

Read More

परभणी (प्रतिनिधी) शहरातील सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीने क्रांतीज्योती क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्ण कुर्ती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सत्यम दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय वाघमारे, गजानन दुधारे, सचिव रामराज कांगणे, उपाध्यक्ष संतोष जोंधळे, जलील पठाण, ज्ञानोबा कदम, सुनील लहाने, राहुल शिवभगत, सुरेश पाचपुंजे, अहमद खान, गणेश शिंदे, ज्ञानोबा ढाले, अनिल पामे आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते

Read More

परभणी, (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या आदर्श आचारसंहिता काळात जिल्हा प्रशासनाने अतिशय उत्तमरितीने जबाबदारी पार पाडत शांत, निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणूक यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगिता चव्हाण, उप विभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्तु शेवाळे, जिवराज डापकर, शैलेश लाहोटी, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर तसेच सर्व तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि पथक प्रमुख उपस्थित होते. राज्य शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांची अतिशय कमी वेळात प्रभावी अंमलबजावणी जिल्हा…

Read More