परभणी( प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यात मागील महिनाभरात पिंगळी, वडगाव आणि पोखर्णी येथे चालत्या रेल्वला सिंगल मध्ये बिघाड करून त्या थांबवून प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडल्या या पार्श्वभूमीवर प्रवाशांना पोलीस संरक्षण मिळावे म्हणून परभणी येथे रेल्वे स्थानकावर जी आर पी पोलीस स्टेशन मंजूर करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत दक्षिण मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापक यांना एक निवेदन पाठवण्यात आले असून त्यात म्हटले आहे की परभणी जिल्ह्यात मागील तीस दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सिग्नल मध्ये बिघाड करून रात्रीच्या सुमारास रेल्वे थांबवून प्रवाशांना लुटीच्या घटना घडल्या आहेत.त्या मुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना प्रवासी असुरक्षित झाले आहेत. जिल्ह्यात पिंगळी, पोखरणी तसेच वडगाव…
Author: Lok Sanchar
परभणी ( प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी चळवळीमध्ये अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व सिद्धार्थ पानबुडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आ.डॉ. पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी पानबुडे म्हणाले की, शेतकरी, कष्टकरी, मजूर, विद्यार्थी यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनत प्रवेश करत आहे. हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणजे प्रखर, ज्वलंत विचारांची कधीही न संपणारी ऊर्जा होते. त्यामध्ये भलेभले अविचारी भस्मसात झाले. त्यांच्या विचारांची मशाल पेटवून आम्ही नव्याने क्रांती करू आणि महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून देऊ की, माणसे आपल्यातून निघून जातात परंतु त्यांचे विचार…
सेलूत श्रीराम कथेची उत्साहात सुरुवात सेलू, (, प्रतिनिधी ): रामकथेची किती संस्करणे निघावेत ? रामकथांची संख्या २०० पेक्षा अधिक आहे. रामचंद्रांचा गोडवा इतका आहे की; परिचय झाला की आपोआप वेड लागते. एवढेच नव्हे तर कथेचे श्रवण करणारांना संपूर्ण वैदिक धर्म काय आहे ? हे आपोआप कळते. धर्म म्हणजे काय ? हे कळून घ्यायचे असेल, तर भाराभर ग्रंथ वाचण्याची गरज नाही. भगवान श्रीराम म्हणजे मूर्तिमंत धर्म असल्याचे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले आहे. सेलू येथील नूतन विद्यालयाच्या ‘हनुमानगढ’ परिसरात बिहाणी कुटुंबियांच्या वतीने आयोजित श्रीराम कथेच्या प्रारंभप्रसंगी मंगळवार, १५ ऑक्टोबर रोजी स्वामीजी बोलत होते. कथेच्या प्रारंभी सकाळी सेलू शहरातून भव्य…
विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी होणार मतमोजणी परभणी, (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी या 4 विधानसभा मतदार संघासाठी बुधवार, 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान तर शनिवार, 23 नोव्हेंबर, 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची परभणी जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क अवश्य बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अपर…
परभणी प्रतिनिधी : लोकसभा च्या तुलनेत विधानसभेला जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी राजकीय पक्ष तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे जेणेकरून जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढेल. आदर्श आचारसंहितेची कठोर अंमलबजावणीसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती देखील या वेळेस जिल्हाधिकारी गावंडे यांनी दिली. आज बुधवार दिनांक 1५ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या घोषणानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. काल निवडणूक आयोगाच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा 2024 ची घोषणा करण्यात आली 22 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे अधिसूचना जारी करणे 29 ऑक्टोबर रोजी नाव निर्देश पत्र दाखल करणे 30 ऑक्टोबर रोजी छाननी 24 ऑक्टोबर रोजी उमेदवारी मागे घेणे शेवटची तारीख तर 20 नोव्हेंबर…
परभणी,(प्रतिनिधी) : आज दुपारी निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आदर्श आचारसंहिता लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य यंत्रणांनी शहरासह जिल्ह्यात छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांसह मित्रमंडळ व संस्थांनी ठिकठिकाणी उभारलेले हजारो होर्डिग्ज हटविण्याची मोहिम युध्द पातळीवर हाती घेतली आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी, रस्ते, मुख्य चौकांमधून बेसुमार होर्डीग्ज उभारले गेले होते. यामुळे प्रमुख रस्ते व मुख्य चौक होर्डीग्जच्या विळख्यामुळे अक्षरशः लूप्त झाले होते. परंतु, या होर्डीग्जधारकांविरोधात स्थानिक स्वराज्य संस्थेसह सरकारी यंत्रणेने कोणतीही कारवाई लगेचच करावयाचे धाडस दाखविले नाही. त्याचा परिणाम असा, रस्त्याच्या दुतर्फासुध्दा खड्डे खोदून, बल्ल्या रोवून काही धुर्त नेतेमंडळींनी, कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यांपर्यंतसुध्दा होर्डिग्ज उभारण्याची स्पर्धा…
सेलू,(प्रतिनिधी) : राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरिजी महाराज यांच्या श्रीराम कथेच्या निमित्ताने मंगळवारी (दि.15) सकाळी नऊ वाजता सेलू शहरातून भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने सेलूनगरी दुमदुमली. तसेच शोभायात्रेतील सजीव देखाव्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. श्रीकेशवराज बाबासाहेब मंदीरपासून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. क्रांतीचौक, नूतन विद्यालय, स्टेशनरोड सारंगीगल्ली हनुमान मंदिर, बिहाणी यांचे घर या मार्गाने श्री बालाजी मंदिरमध्ये शोभायात्रेची सांगता झाली. शोभायात्रेत श्रीरामायण ग्रंथ दिंडी, बँड पथक, धर्म ध्वज, अश्व, मारोती ध्वजधारी युवक, लेझीम पथक मुले-मुली, श्रीराम उत्सव मूर्ती, कलशधारी, तुळसधारी माता भगिनी, महिला भजनी व वारकरी भजनी मंडळ, वेद विद्यालयाचे विद्यार्थी, स्वामीजींचा रथ, माता-भगिनी, बंधू उत्साहाने सहभागी झाले होते.…
पालम ( प्रतिनिधी ) तालुक्यातील सोशिओ इकोनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्ट केरवाडी संचलित श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी ही शाळा,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा – 2 मध्ये खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा या गटातून शाळेने छत्रपती संभाजीनगर विभागातून तृतीय क्रमांक पटकावला आहे. सदर शाळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा .ना.एकनाथ शिंदे साहेब , शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते शाळेतील शिक्षकांचा गौरव प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि धनादेश देऊन शाळेतील सर्व शिक्षक व संस्थापक अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी सर यांना सन्मानित करण्यात आले. हा पारितोषिक वितरण समारंभ मुंबई येथील जमशेदजी भाभा सभागृह, एनसीपीए येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रधान…
परभणी( प्रतिनिधी )आज दिनांक 15 मंगळवार रोजी प्रभाग क्रमांक 10 येथे विकास कामांना प्रारंभ करण्यात आला आहे . यामध्ये काकाजी यांच्या घरापासून ते मस्के दोन्ही बाजूने पेवर ब्लॉक करणे, पोस्ट कॉलनी येथे खेडकर यांच्या घरापासून शेळके रिकामा प्लॉट पर्यंत पेव्हर रस्ता करणे तसेच चव्हाण भाभी यांच्या घरापासून सीसी रोड करणे, वैभव नगर संजय हॉटेलच्या मागच्या बाजूला ते अंभोरे यांच्या घरापर्यंत दोन्ही बाजूने पवार ब्लॉक टाकणे, सोळुंके घ्यायच्या घरापासून ते जाधव यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजू पेवर ब्लॉक टाकणे डॉक्टर धुतमल हॉस्पिटल ते डॉक्टर सांगळे हॉस्पिटल दरम्यान रस्ता करणे, सहकार नगर येथे उद्यान विकसित करणे तसेच रायगड नगर येथे उद्यान विकसित…
परभणी (प्रतिनिधी) परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील प्रवाशांचे लक्ष लागलेल्या बहुप्रतिक्षित आणि परभणी शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या बसपोर्टच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा लोकार्पण सोहळा शिवसेना ठाकरे गटाचे आ.डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते मंगळवार, दि.१५ आॅक्टोबर रोजी पार पडला. परभणी शहरातील जुन्या बस स्थानकाची अवस्था बिकट झाल्यामुळे आ.डॉ. पाटील यांनी पाठपुरावा करत तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या माध्यमातून परभणीत बसपोर्टला मंजुरी मिळवली होती. सातत्याने पाठपुरावा करत बस पोर्टचे काम सुरू केले.१३ कोटी ४८ लाख रुपयांच्या निधीतून बसपोर्टचे काम पूर्णत्वाला गेले आहे.आता केवळ इलेक्ट्रिकल आणि सौंदर्यकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारे मध्यवर्ती बस स्थानक म्हणून परभणीच्या बसस्थानकाची ओळख आहे. त्यामुळे परभणी…